पान:Paripurti.pdf/23

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


परिपूर्ती / २५
 

काही पाण्यातल्या लाटासारखे अव्याहते खालीवर हलत नव्हते. ह्या लाटा जणू थिजल्या होत्या. मी त्या लाटांच्या एका उंचवट्यावर उभी होते दोन्ही बाजूला उथळ खोलगट भाग होता; व त्यापलीकडे दुस-या लाटांचे उंचवटे दिसत होते क्षितिजापर्यंत अशा वाळूच्या लाटा पसरल्या होत्या. दहा-पंधरा हजार वर्षापूर्वीही त्या अशाच असणार हे टेकाड असेच पण जरा ठेंगणे असणार. आत्ता त्यावर गेल्या पंधरा सहस्रकांच्या वाळूचे थर साचले आहेत. त्यावेळी ही रानटी माणसे येथे वस्ती करून होती. अशाच तळ्याचे पाणी पीत होती. आणि.. आणि..? धुके क्षणभर बाजूला झाले होते. अज्ञातांच्या पलीकडे ओळखीचा चेहरा दिसल्यासारखा वाटला पण परत सर्व-धुक्यात बुडून गेले सबंध दिवस असाच गेला. रात्री निजले तीही क्मिनस्क अवस्थेत.. मन व शरीर कशी श्रांत झाल्यासारखी झाली होती.
 मी ताडकन उठले कसला तरी मोठाकोलाहल चालला होता. माझ्या नावाने हाका ऐकू येत होत्या.कसल्या तरी भीतीने मी थिजल्यासारखी झाले होते. पण कोलाहल वाढला. छे:! मला गेलेच पाहिजे. मी चालत जाऊन दाराच्या कडीला हात घातला. इतक्यात विजेच्या दिव्याचा झोत माझ्या अंगावर पडला, व “कोण आहे?" असा माझ्या सहकाऱ्याचा परिचित आवाज कानावर पडून मी जागी झाले. माझे पाया लटपटत होते, तोंडाला कोरड पडली होती. मी आहे. जरा बाहेर जाऊन येते, असे उत्तर देऊन ली खोली बाहेर सोप्यात आले थंडीच्या कडाक्यात माझे अंग शहारले. बाहेर ठेवलेल्या माठातील बर्फासारखे गार पाणी मी घोटभर प्याले. पाणी इतके गार होते की, पाण्याचा घोट तोंडातून पोटापर्यंत पोचला ती सबंध वाट जणू बर्फाने कापीत कापीत गेल्यासारखे वाटले, पण त्यामुळे माझी झोप पार उडाली. मी शुद्धीवर आले. अंधारी रात्र होती.उत्तर गुजरातची कडक थंडी पडली होती. स्वच्छ गडद आकाशात तारे चमकत होते व सर्व सृष्टी अगदी निस्तब्ध शांत होती. मी डोळ्यांवरून हात फिरवला; एक निश्वास टाकला. खूप रडल्यावर घसा दुखाचा, छाती जड वाटावी, तसे मला वाटले. पण मी का उठले? मला कसले स्वप्न पडत होते? काही आठवेनामी परत आत गेले माझ्या कोफ्यात जाऊन निजले
 ह्यानंतर दुस-याच दिवशी आम्हाला ‘ती’ सापडली. पहिल्याने तंगडीचे हाड मोकळे झाले, ह्यामुळे माणूस असल्याचा सुगावा लागून कामकन्यांना दूर सारले, व आम्ही लहान-लहान हत्यारांनी सावकाशपणे