पाहणाऱ्यांच्या हृदयात भीतीची चमक उठत होती. माणूस अगदी तरणाबांड पुरुष होता जेमतेम २५-३० वर्षांचा असेल नसेल. कामकरीसुद्धा स्तब्ध होते. शेवटी म्हातारा हिरोज़ी म्हणाला, “बाई, हा माणूस लढाईत मेलेला असणार." त्याच्या शब्दाबरोबर सगळ्यांना वाचा फुटली. आमच्या साहेबांचा तरुण मदतनीस म्हणाला, “हो हो, हा जवान लढाईत मेला, आणि त्याच्या दु:खानं त्याचा म्हातारा बाप मेला." माझी व सांकळियांची दृष्टाष्ट झाली, वे आम्हाला दोघांनाही हसू लोटले.
दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशीच्या सांगाड्यापलीकड़े पाच-सहा हातांवर एक कुत्रे पुरलेले आढळले. “कुत्रं कसं बुवा मेलं?" मंडळी विचारीत होती. पण त्या कुत्र्यामुळे एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली होती. कुत्रा काही आपोआप मेलेला नव्हता. त्याच्या डोक्यात दगड घालून त्याला ठार मारला होता. "ह्या जुन्या वसाहतीत एक, माणूस- बहुधा पुरुष... मला असला पाहिजे, व त्याला पुरताना त्याचे नोकरचाकर, हत्यारे, त्याचा विश्वासू कुत्रा, सगळ्यांना मारून पुरले असले पाहिजे, असा मी उलगडा गेला, तो सगळ्यांना पटला व काम दुप्पट उत्साहाने सुरू झाले.
गेल्या वर्षी आम्हाला कितीतरी अवशेष सापडले होते, पण त्यान माझ्या मनाला असा चटका लागला नव्हता. यंदा मात्र गतकालाती जीवनाच्या ह्या अदभुत आविष्काराने माझे मन भारावल्यासारखे झाले होते. माझे शरीर व मनाचा एक भाग सगळ्यांच्याबरोबर काम करीत होता.
माझ्या ताब्यात आलेले सांगाडे नीट उकरून, मातीसकट वर उचलून, मेणवून, त्यांना कापडाच्या लांब लांब पट्यांनी घट्ट बांधून, कापता गुंडाळून, ट्रंकेत ठेवणे वगैरे कामे मदतनीसांच्या साहाय्याने चालला पण मन मात्र मुळीच ठिकाणावर नव्हते. हिवाळ्याच्या दिवसात दाट धुक्यातून पलीकडे पाहण्याचा प्रयत्न करावा, धुके क्षणमात्र विरळ ९ पलीकडे काहीतरी ओळखीचे दिसल्याचा भास होऊन ती वस्तू परत गुरफटून जावी तसे मला झाले होते. मी टेकाडावर उभी राहून एकदा च नजर टाकली. वाळूचा दर्या अनंत पसरला होता. खाली तळे एखाद्या
आरशासारखे नितळ पसरले होते. त्यावर लहानशीसुद्धा लाटचा नव्हती. समुद्र कधीच असा नितळ नसतो, कितीही शांत असला तरी लाटांच्या लहानलहान टेकड्या त्यावर असायच्याच, तसेच अगदी लहान लहान उचवटे ह्या वाळूच्या समुद्रावर वाव्याच्या दिशेने पसरलेले होते. पण ते
पान:Paripurti.pdf/22
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४ / परिपूर्ती