Jump to content

पान:Paripurti.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
परिपूर्ती / २१
 

पाणी "तापले म्हणून एकेकाने जाऊन आघोळ उरकली व संध्याकाळच्या जेवणाचीं वाट पाहांत सोप्यात खुर्च्या टाकून बसलो.ह्याच सुमारास गावातील चार शिष्ट मंडळी भेटावयास आली- एक मास्तर, एक डॉक्टर, एक व्यापारी व इतर दोन-तीनं मंडळी होती. ‘तुमच्यासारखी मोठी माणसं आमच्या कुग्रामाला भेट देतात म्हणून आम्हास घन्य वाटतं,' वगैरे औपचारिक बोलणी चालली होती. त्यातला एक बराच म्हातारा होता तो म्हणाला,"अहो, कसंचं कुग्राम आणेि कसंचं शहर घेऊन बसलात! नशीब नेत तशी माणंसं फिरत असतात. ज्याच जिंथ अन्नपाणी तिथं तौ जातो." दुसरी म्हणाला, हे तर खरच आणि मागल्या जन्मीचे लागेबांधे असल्याशिवाय का तुमच्या-आमच्या गाठभेटी होतात?" श्री.सांकळिया सर्वांशी हसून बोलंत होते, आम्ही बाकीची 'स्तब्ध बंडून अधूनमधून माना डोलवीतं होतो. गेल्या वर्षांची परिचित सृष्टी समोर दिसत होती. सूर्य पिवळ्या लखलखंत्या सोनेरी किरणांनी सगळ्या वस्तूंना मुलामा चढवीत होतो. ही किरणात आल्हाददायक चमक होती, पण तीव्रता नव्हती आता सगळीकडे शुद्ध बावनकशी सोन्याच्या रंगात झाडांचे शेंडे घराची छपरे शेते रंगून निघाली होती. समोरच्या तळ्यावर वाऱ्याच्या झुळकीसरशी सोन्याच्या लहरी पसरत होत्या. हळूहळू ह्या शुद्ध सोन्याला लाली चढू लागली. गिनीची भट्टी तापत होती. "हं! पक्षी घरी यायची वेळ झाली: असे मी मनात म्हणते तोच माझ्या उत्सुक कानाना सारस पक्ष्याचा कर्कश पण आर्त स्वरं ऐकू आला व बंगल्यापुढून एक जोडी तळ्याच्या दिशेने गेली. किती खाली उडत होते ते! त्यांचे लाब, राखी, निळसर पंख ताणून पसरले होते, दोन-अडीच फूट लांब पाय मागे लांबवले होतें, तितकीच लांब गोलं मान पुढे लांब चोचीच्या टोकाशीं निमुळती झाली होती मधूनच ते 'कर क्रे' ओरडाचे वे आपल्याजड लांब पंखांची खालीवर हालचाल करायचे. ‘विमान चाललंयं जणू! आमच्यातला एकजण म्हणाला, 'मी मानेनेच नकार दिल.. छै! विमान किती उडाल तरी ह्या जिवंत सौंदर्याची प्रचीती मला कधी आली नाही. विमानांचे सगळे भाग कसे एकमेकांनां घट्ट साधलेले असतात. त्यांचे लांबलंबं पंख कसे कुठच्याही स्थितीत विमानाच्या अंगाशी एकच कोन करूनै ताठ पसरलेले असतांतं. छे: ते उडणं निर्जीव असतं, तो एक मानवी बुद्धीचा उत्कर्षे असतो. पण ही पक्ष्यांची जोडी! त्यांचे ताठ लांबवलेले मान-पाय-पंख क्षणक्षणाला स्पंदन पावत