या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३
जन्मांतरीची भेट
गाडी हळूहळू चालली होती. प्रवास आता
अगदी थोडा राहिला होता. घरी घोटाळत
असलेली आमची मने पण हलके हलके नव्या
वातावरणाचा विचार करू लागली होती व डोळे
बाहेरची शोभा पाहात होते. स्टेशन आले
उतरायची एकच धांदल उडाली. आमचे स्वागत
करावयास तलाठी व पटेल आले होते.
स्टेशनच्या बाहेर कुंपणावरून आमची मागच्या
वर्षांची कामकरी मंडळी जोरजोराने ओरडून
आमचे स्वागत करीत होती. महादा आला होता.
वाघजी, वरसंग, षडिया, हिराजी एवढी मंडळी
दिसली. त्यांच्याच शेजारी पोरी पण हसऱ्या
चेहन्याने उभ्या होत्या- मणी, लासू, बब्वो,
सूरज. एवढे कायछोटा भिकला पण
सर्वांच्या पुढे नाचत होता. बर्याच दिवसांनी
आपल्या मित्रांकडे पाहुणे जावे तसे वाटले.
तशी मंडळी काही आम्ही फारशी नव्हतो.
ह्या कामाचे मुख्य प्रा.सांकळिया, मी, एक
छायाचित्रकारएक भूपर्यवेक्षक (स्वैयर!), एक
सांकळियांचे मदतनीस, एक माझा विद्यार्थी व