Jump to content

पान:Paripurti.pdf/16

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१८ / परिपूर्ती
 

हृदय पाखरासारखे पिटपिट करीत होते. तिला शांत केली, समोरच्या चंदूकडे पोचवली व मी धावत घराच्या गच्चीवर गेले. मी पण घाबरले होते,घाबरण्यापेक्षाही मला राग आला होता. मी हंदके देत पण रागानेच घराला वआतील सर्व वस्तूंना सांगितले, ‘पाहिलं तुमच्या लाडाचा काय परिणामझाला तो? सांगितलं नव्हतं मी की, मुलं जास्तच बेफिकीर व निष्काळजी होतील म्हणून? आज तुमच्यामुळे माझी पोरगी हातची जात होती. कसला आला आहे मनोविकास? माझ्या रागावण्यानं ती खुरटतात काय? मूर्ख नाही तर! त्यांची डोकी हापटली तरच शहाणपण येईल, एरवी नाही. आणि जर तुम्ही ह्याउपर ऐकणार नसाल तर साच्या मुलांना बोर्डिगात पाठवीन. मग तुम्हाला मुलांचं हसणं, रडण, भांडण, बोकाळणे, काही ऐकू यायचं नाहीं, "आई ग!" म्हणून एवढ्यात किंचाळणे ऐकू आले. मी खाली धावले तो नंदोबा रडत होता. डोके दारावर आपटून चांगलेच सुजले होते. थोडक्यात बचावला, नाहीतर डोळाच जायचा. ‘स्वैपाकघरात‘चल , हळदीचा ओढा घालते. मी त्याचा हात धरून त्याला नेले.