Jump to content

पान:Paripurti.pdf/15

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
परिपूर्ती / १७
 

नाही म्हणून मी विचार करू लागले की, घराला व घरातल्या वस्तूंना झाले आहे तरी काय?-घरी कोणी नाहीसे पाहून एकदा सगळ्यांना सांगितलेसुद्धा की, "बाबांनो, तुम्ही मुलांना जपता ते ठीक आहे; पण तुमच्या अशा करण्यानं पोरं दिवसें दिवस जास्तच बेफिकीर राहू लागली आहेत. तुमच्या ह्या-लाडानं त्यांना पुढे पस्तावा करण्याची पाळी येईल." पण काही उपयोग झाला नाही, इतके दिवस बाकीच्या घरांसारखे वागल्यावर इतक्या दिवसांनी एकदस ह्या घराला वेड का लागले? मला आता आठवले. गौरीच्या गुडघ्याला लागले. त्या दिवशी भावजी आले होते. आम्ही चहा घेत असता ताईबाई गाणे गुणगुणत येता-येता हापटल्या. वाटेतल्या स्टुलावर, मी नेहमीप्रमाणे कडाडले. भाऊजींनी उठून ताईला हात धरून-उसी केले त्र-दोन गोष्टी बोलून खेळायला पाठविले जाणि-नंतर मला एक व्याख्यान ऐकवले "मुलं म्हणजे कशी फुलांसारखी असतात. असं त्यांना सामावलं म्हणजे त्यांचा व्यक्तिविकास थांबतो व त्यांची मनं खुरटी होतात. तू एवढ़ी शिकलेली पण तुला साँटेसोरीली तत्वं काहीच कशी समजत नाहीत त्यांना काही लागायच्या आतच. आपण त्यांच्यापुढची अडचण काढावी." मी म्हटले, "बाबा रे, घरातल्या सगळ्या वस्तू काढूनसुद्धा भागणार नाही..."
"छे! असं बोलू नकोस. अशा बोलण्यानं ती जास्तच धडपडतात व त्यांना न्यूनगंड उत्पन्न होतो." मी भाऊजींशी वाद घातला नाही. ते गेल्यावर थोड्याच वेळाने गौरीला लागले व मी चोप देण्याची धमकी घातली. भाऊजींचे व्याख्यान सबंध घराने तर नाही ना मनावर घेतले? मी एक नि:श्वास टाकून कामाला लागले.
 मुलांची बेपर्वाई न आंधळेपणा वाढत होता व सर्व घर त्यांच्या मार्गातून बाजूला सारून त्यांचा मनोविकास करीत होते. गौरी न् मी बागेत उभ्या होतो. इतक्यात समोरून आरोळी आली, “गौरी ग धाव, हा बघ मासा कसा करतोय ते!" गौरी फाटक उघडून रस्ता ओलांडायला धावली. नेहमी ती इकडे तिकडे पाहून जायची, पण आज मात्र तिने एकदम रस्त्यात उडी घातली. रस्त्यातून केवढी मोठी लष्करी मोटार भरधाव येत होती. तिचा कर्कश भोंगा वाजला, ब्रेक दाबून चाके खर्रकन रस्त्यावर वाजली व मी धावत जाऊन जवळजवळ गाडीपुढूनच पोरीला ओढून काढले. तिला घट्ट हृदयाशी धरले; ती खूपच भेदरली होती; ओठ पांढरेफटक पडले होते व