त्यांचे प्रेमातले भाषण म्हणजे असेच. मुलींना ते 'म्हैस' म्हणत व मुलांना
'बैलोबा'. आम्हाला मुले झाल्यावर ही प्रेमाची बिरुदे ते नातवंडांना लावू
लागले.
"ह्यांनी आपलं सर्व आयुष्य स्त्रियांच्या उन्नतीकरिता वेचलं..." बाई
बोलत होत्या तिकडे माझे लक्ष गेले. हे उदगार बाबांबद्दल खास नव्हते.
“ह्यांनी काढलेल्या स्त्री-शिक्षण संस्था सुपरिचित आहेत.” अस्से, अस्से.
आता मामंजींबद्दल बोलत आहेत वाटते. ठीक, चालू द्या. आहे अजून बराच
अवकाश. मी जरा पाय लांबवले, कोचावर अंग जरा जास्त रेलले व डोळे
फार वेळ न मिटण्याचा निश्चय केला. “सर्व स्त्रियांना त्यांनी आपल्या ऋणात
बांधलं आहे." माझी ओळख करून देणे चालूच होते- खरंच, मामजीना
मला कोणत्या ऋणात बांधले आहे? त्यांच्या मुलाची बायको म्हणून मी
त्यांची ह्यापलीकडे त्यांच्या-माझ्यात काही बंधन होते का? लग्न होऊन मी
घरी आले तेव्हा निदान सासरचे वडील माणूस म्हणून फक्त कर्तव्यभावना तरी
होती. त्यांचीही माझ्याबद्दलची भावना अशीच असावी. मुलाला आवडली
ना, मग माझे म्हणणे नाही. एका माणसासाठी सर्वस्वी अनोळखी माणसांत
मी जाऊन पडले होते. ती माझ्याबद्दल साशंक होती, मी त्यांच्याबद्दल होते
लौकिकात मी त्यांना व त्यांनी मला आपले म्हटले होते. पण मने मिळायची
होती. त्याच्यासाठी किती तरी काळ लोटायचा होता. मला त्यांचे करायचे
होते, त्यांनी माझ्या उपयोगी पडायचे होते. किती भांडणे व्हायची होती,
कितीदा समजुती काढायच्या होत्या! प्रत्येक सासुरवाशीण ह्याच चक्रातून
जात असणार, सासरची माणसे हीन असली तर ज्या माणसाच्या पप्रेमामुळे
मुलगी घरात आली त्याचेसुद्धा प्रेम नाहीसे करून तिला निराधार करून
टाकतील. पण माझ्या सासरची माणसे सुवृत्त, चारित्र्यसंपन्न अशी होती. दर
भाडणातून, आयुष्यातील दर प्रसंगातून, प्रेमाची नवी-नवी बंधने निर्माण होत
होती, व आज माझी मुले केवळ आईबापांच्या नाही. तर काका-काकूंच्या
मामा-मामींच्या व दोन्ही आजोबा-आजींच्या प्रेमाच्या उबेत वाढत होती,
मामंजी तर माझ्या घरात चालताबोलता आशीर्वाद नाहीत का?
“कॉलेजात ते शास्त्र शिकवितात." बाईचे शब्द परत ऐकू आले.
"त्यांनीही वडिलांप्रमाणे आपल्याला शिक्षणकार्याला वाहून घेतल आहे."
मामजी संपून आता ह्या बाई माझ्या नवऱ्याकडे वळलेल्या दिसतात. काय
वरवरचे बोलत असतात माणसे! ह्यांना माहीत तरी आहे का ता का तो कसा आहे
पान:Paripurti.pdf/142
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५६ / परिपूर्ती