पान:Paripurti.pdf/134

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


१४८ / परिपूर्ती
 

खाता खाता त्या गोळ्याला हळूहळू रंगरूप येऊ लागले व त्याने हसून पाहिले म्हणजे आपल्याला धन्य धन्य मानतात. अशा ह्या आयांना मानवी शरीर कसले केले आहे त्याची पूर्ण जाणीव असते. त्याचे वर्णन करून का त्यांचे मन संसारातून उडून जाणार आहे? पुरुष ब्रह्मचारी असले तरी एका स्त्रीसंगाखेरीज शरीराचे इतर सर्व व्यवहार अगदी नीट आस्थेने चाललेले असतातच. खाण्यापिण्याची चोख व्यवस्था बायको नसली तरी होत असतेच. अशांची नीट व्यवस्था करण्याचा भार गृहस्थाश्रमी लोकावरच असतो. त्यांची जेवणा-खाण्याची सोय कुणी तरी रक्ताची नाही तर धर्माचा आई-बहीण करीत असते. ब्रह्मचाऱ्याची सेवा करण्यास निष्ठेने व भक्ताने स्त्रियाच पुढे सरसावतात. जिवंतपणी तर त्यांची सेवा होतेच, पण मेल्यावर ही भक्ती स्त्रिया पुढे चालवितात. ह्याचे एक मजेदार उदाहरण वाटेनच पाहिले. पंढरपूर जसजसे जवळ-जवळ येऊ लागले तसतशा सर्व महाराष्ट्रातून पालख्या येऊन ज्ञानदेवांच्या पालखीला भेटू लागल्या. पंढरपूरच्या अलीकडील मुक्कामाला तर पालख्या व दिंड्या ह्यांचे एक नगरच वसते. तेथे सर्व महाराष्ट्राची हजेरी लागते. देहहन तुकाराम महाराज, सासवडहून सोपानकाका, खानदेशातून मुक्ताबाई, उमरावतीहन खुद्द रखुमाई अशा कितीतरी पालख्या येतात. पैकी काही वाटेतच भेटतात. त्यापैका यंदा सज्जनगडाहून रामदासांची पालखी आली. तिची गाठ वाटेत पडली; पालखी वाहणारे पुरुष होते, पण जवळपास चालणाऱ्या, चवरी ढाळणाऱ्या बायाच होत्या. 'सावधान' म्हणताक्षणीच जिवंतपणी पळून जाणारे साधु रामदासबुवा मेल्यावर स्त्रियांच्या गराड्यात सापडलेले पाहन मला हसू आले. स्त्रियाच अशा साधु-पुरुषांची सेवा करण्यासाठी अहमहमिकेने पुढे येतात. ही भक्ति पुष्कळदा सर्वस्वी निष्काम अशी असते. जिला ना पोर ना बाळ, जिचा संसार लहानपणीच उधळला गेला अशी कोणी बाई. बवांना नीट खायला मिळावे; ते अन्न सुग्रास असावे, ते खाणाऱ्याच्या ताटात ऊन-ऊन पडावे म्हणून धडपड करताना पाहिली म्हणजे बुवांच्या वत्सल हृदयाचीच किंमत मला भारी वाटायची. ऐशी कळवळ्याची जाति । करी लाभावीण प्रीता।।
 मदालसा एकदा पूर्ण ऐकल्यावर माझे मन त्यात रमेनासे झाले. हिंदूच्या समाजजीवनात गृहस्थाश्रमाचे महत्त्व कमी होऊन ब्रह्मचर्याचा व संन्यासधर्माचा बडेजाव कसकसा वाढत गेला ह्याबद्दल माझे विचार भरकटत जायचे. निर्गुण-निराकार ब्रह्माचे आकलन होणे कठीण म्हणून देवाला