पान:Paripurti.pdf/127

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


परिपूर्ती / १४१
 

तेव्हा मी म्हटले, “हा तर नाही ना आपला कंदील विचारू का त्यांना?' पण माझ्याबरोबरच्या बाईने ओरडून कंदील नेणाऱ्या बाईला आधीच हटकले, "ए बया, कोणाचा कंदील चालवला आहे?" ती बाई झटदिशी वळून म्हणाली, “कंदील माझा आहे. आणि 'बया, बया' कोणाला ग करतेस?" चूक आमचीच, पण माझ्याबरोबरच्या बाईंना आश्चर्य वाटले. त्या माझ्याकडे वळून म्हणतात, “पाहिलंत ना कसा रागाचा झटका आला तो? 'अग बया' म्हणायचीसुद्धा चोरी झाली बरं का!" आता शब्दाने शब्द वाढू नये म्हणून मी घाईघाईने वर निघाले. पण आपल्या वागण्यातला व बोलण्यातला उद्दामपणा आपणास कसा जाणवत नाही ह्याचे आश्चर्य व उद्वेग मात्र किती वेळ वाटत हाता. पांडुरंगाच्या पायावर डोई ठेवण्यासाठी दिवसेंदिवस कष्टणाऱ्या आम्ही आमच्याबरोबरच्या जिवंत देवांची अशी अवहेलना का करावी?
 पण परिस्थितीचे हे माझे विश्लेषण व्यर्थ भावनेच्या आहारी तर जात नाही? ब्राह्मण आणि इतर ही एक सामाजिक परिस्थिती आहे. बहुसंख्य लोक ही परिस्थिती मान्य करतात- त्यात काही वैषम्य मानीत नाहीत- मी मात्र व्यर्थ त्याचा बाऊ करीत आहे असे तर नाही? तसे खास नाही. ब्राह्मण व इतर हा उपमर्दकारक फरक अनेक रूपकांनी, अनेक अभंगांनी वारकरी सप्रदायातील संतांनीच नाही का दाखवला? ब्राह्मणांच्या अन्यायाची दाद त्यानी पांडुरंगाजवळ नाही का मागितली? "चोखा जरी डोंगा भाव नव्हे डागा... का भुललासी वरल्या सोंगा?" हा अभंग आमच्या दिंडीतील भजनी मडळी कालच आळवन म्हणत होती ती काय त्याचा अर्थ न समजून! सामाजिक विषमतेविरुद्ध हे बंड फक्त अभंगात न राहता हळूहळू कृतीत उतरणार हे स्पष्ट दिसत असता आम्ही आंधळेच राहणार का? सोवळे- ओवळे, एकाचे पाणी चालते, एकाचे वर्ण्य, ही वरली सोंगे आम्ही अजून बाळगून राहणार का? आचारशद्धतेच्या नावाखाली माणुसकी व शजार गमावून बसणार का? "भाव नव्हे डोंगा"... त्या भावाचा मधुर आस्वाद घेण्याची लायकी आमच्यात कधीच का नाही येणार?
  पण सुसुदैवाने हे निष्फळ म्हणन कड विचार डोक्यात फार वेळ चा परिस्थिती नव्हती. सगळे वातावरण आनंदमय होते- भांडण, शिव्यागाळी होत नव्हते असे नाही, पण इतर प्रसंगांच्या मानाने फारच कमी. कोणी भांडायला लागले तरी "काय पंढरीच्या वाटेवर भांडता हो?" असे इतरांनी म्हणावे व भांडणारांनी शरमून बाजूस व्हावे असाच प्रकार अनेकदा