पान:Paripurti.pdf/125

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


परिपूर्ती / १३९
 

स्वयंपाक बायका करीत, वाढणे, पाणी आणणे, मोठे सामान मोटारीत भरणे, वगैरे कामे पुरुष करीत. एकंदर बायका-पुरुषांचे वागणे जास्त खेळीमेळीचे होते. म्हणजे एकत्र बसणे, हासणे वगैरे नसे, पुरुषांची बैठक व बायकांची बैठक लांब लांब असे, पण वागण्या-बोलण्यात खुलेपणा असे. ब्राह्मण मंडळीत बरेचसे काम बायका करीत. पुरुष दोघेच, त्यातील एक प्रवचनकार, तेव्हा ते असले म्हणजे बायका चूपचाप असत, दुसरे थोडेबहुत काम करीत, पण एकंदर कामाचा बोजा बायकाच उचलीत. तसे मराठ्यांचे काम सुटसुटीत असे; सोवळेओवळे, निरनिराळे उपास, वगैरे नाहीत. एकदम पक्ता बसायच्या व एकदम उठायच्या. म्हणून पन्नास-साठ मंडळी असूनही भराभर उरकत असे. एका दिंडीत असून जेवण निरनिराळे ह्याचे मला रोज वैषम्य वाटे. ती मंडळी सर्व स्वच्छ, अंग धतल्याशिवाय न जेवणारी अशीच होती. मग हे अंतर? का एकत्र चालण्याने, देवाचे भजन करण्याने, संताचे काव्य बरोबर म्हणण्याने काय फक्त पारलौकिक कल्याणाचा व्यापार साधायचा होता, आणि ह्या जगातील द्वैत कायम ठेवायचे? असा प्रश्न सारा वेळ माझ्यापुढे असे. बरोबरच्या ब्राह्मण मंडळींनी प्रेमाने मला आपलेसे केले होते. तसेच मराठे बायांनीही केले होते. दोन्हींना एके ठिकाणी आणणे शक्य नव्हते; म्हणून मी आज इकडची तर उद्या तिकडची पाहुणी म्हणून माझ्यापुरते तरी दोन्ही सांधायचा प्रयत्न करीत होते. आणि खरोखरीच एकत्र जेवणाच्या दिवसापासून त्या बाया जास्त आपलकीने वागतात असे वाटले. रस्त्याने चालताना कित्येकदा माझ्याबरोबर चाल लागल्या. माझा हात हातात धरून पाशा किती मनमोकळ्या गोष्टी बोलत. शेवटी शेवटी काहीजणींनी "बर का, ताई, आम्ही पुण्याला तमच्याकडे येऊ बरं का!" असेही सांगितले. एक मुलगी म्हणाली, “पण ताई. तेव्हा आता वागता तशा वागाल . पण मला वर्मी लागला- आज हजारो वर्षे आम्ही शेजारी राहतो, पण अजून त्या आमच्या व आम्ही त्यांचे झालो नाही.
 हे असे का होते? ब्राह्मण मंडळी इतकी का दुष्ट आहेत छे! मुळीच नाहीत. त्या मराठा बायांना कोठे लागले तर पुढे होऊन औषध द्यायची. कोणाला भूक लागली तर खात्रीने पोटभर जेवू घातले असते. पण त्यांच्या हातचे खाणे व त्यांनी आणलेले पाणी पिणे हे मात्र त्यांना वर्ण्य होते. ह्यात काही वावगे करतो असे कोणाच्या मनातही येणे शक्य नव्हते. सर्वजणी एका जुन्या रूढीच्या चक्रात सापडलेल्या होत्या. काही मनापासून रूढी पाळीत