पान:Paripurti.pdf/124

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


१३८ / परिपूर्ती
 

पायाने चाललेली नसून भोवतालची चलसृष्टी मला लांब-लांब नेत आहे. रात्री निजले तरी मी चालतच आहे असा भास मला होई व सकाळी उठल्यावर रात्रीच्याच ठिकाणी मी कशी ह्याचे मला आश्चर्य वाटे.
 आज आमच्या दिंडीतल्या मराठे मंडळींचा व ब्राह्मण मंडळींचा मुक्काम दुपारला शेजारी-शेजारीच होता. दिंडी त्यांचीच होती. सामानाची मोटार, लाकडफाटा वगैरेंची व्यवस्था, त्याचप्रमाणे दपारच्या मक्कामाची व रात्रीच्या बि-हाडाची जागा दिंडीचे मराठा मालकच बघून ठेवीत. रोज बराबर चालायचे, जवळजवळ मुक्काम असायचा; पण जेवण मात्र निरनिराळे, हे मला कससच वाटे; म्हणून मालकांना म्हटले. “बवा. आज मला तुमच्याकडे जेवण घाला." बुवांनी मोठ्या अगत्याने कबूल केले. मोटार आल्यावर भराभर स्वयंपाक खाली उतरला, चूल पेटवून वरण गरम केले. पत्रावळी माडल्या व एक पुरुषांची व एक बायकांची अशा पंक्ती मांडल्या. वाढप एक- दोन बाया व दोन-चार पुरुषांनी केले. बायांनी फक्त पहिली वाढ केली, शेवटपर्यंतचे वाढणे पुरुषांनीच केले. सर्व बायकांत हसत खेळत जेवण झाले. रात्रीचे बिहाड असेल तेथे बायकांनी पहाटे साडेतीन-चार वाजता उठावयाचे व दोन-तीन चुली पेटवून भात, भाजी. पोळ्या असा स्वयंपाक करून भांड्यांची तोंड गच्च बांधून तो स्वयंपाक मोटारीत सर्व सामानामाखाली भरायचा अशी मराठे मंडळींची प्रथा होती. दुपारच्या मुक्कामाला भात चांगला गरम असे व त्यावर गरम केलेले वरण घातले म्हणजे अन्न रुचकर लागे. ह्या प्रथेचा फायदा म्हणजे दुपारच्या मुक्कामाला पोहोचताच जेवणाची पाने पडत, जेवण झाल्यावर दोन तास पालखी हालेपर्यंत विश्रांती मिळे व दुपारची चाल अगदी भरल्या पोटी होत नसे. ब्राह्मणांचा स्वयंपाक मुक्कामावर होई. चूल मांडून, पाणी भरून आणून, भाजी वगैरे चिरून, भात, पोळ्या भाजी, आमटी एवढा स्वयंपाक होण्यास सहज दीड तास तरी लागे. त्यापुढे पुरुष सोवळ्याने बसत. त्यांचे झाले की सोवळ्यातल्या बाया दोन्ही वेळचे पान न बसत. नतर स्वयपाक ओवळ्यात घेऊन आम्ही बसत असू तोंडात घास पडेपर्यंत सपाटून ऊन लागायचे व नंतर जेवण झाल्यावर तहान तहान होत असे. जेवण झाल्यावर घाईघाईने ओढ्यावरून भांडी घासून आणून पोती भरून मोटारीत ठेवायची गर्दी असे. कारण मोटार रात्रीच्या मुक्कामासाठी पुढे जात असे. नंतर जेमतेम अर्धा-पाऊण तास विश्रांती मिळेतो पालखी हालली म्हणजे निघायची वेळ व्हायची. मराठी मंडळींमध्ये