पान:Paripurti.pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
परिपूर्ती / १३७
 

दिंड्या आणि नंतर पालखी घातलेली गाडी व मागे मैलभर चालणारी मंडळी. बायका पुरुषांच्या बरोबरीने होत्या. त्यांची लाल, हिरवी, निळी निरनिराळ्या काठांची लुगडी, पुरुषांची मुंडाशी व पगड्या, झेंडेकऱ्यांचे उंच फडफडणारे भगवे झेंडे, दोन्ही बाजूंना मैल न मैल पसरलेली काळीभोर नांगरलेली शेते - लांब क्षितिजावरच्या टेकड्या, रस्त्यावरची हिरवळ आणि वरती पावसाळी ढगांमधून डोकावणारे निळे आकाश हा देखावा किती बघितला तरी माझ्या डोळ्यांची तृप्ती होत नसे. दुपारच्या मुक्कामात ओढ्याकाठी वावरात हजारो मंडळींचा मुक्काम होई. चालणारे रंगीत चित्र काही काळ काळ्या दगडाळ माळावर स्थिर होई. बायका-पुरुषांचा पहिला उद्योग पहाटे आंघोळ करून आणलेली ओली चिरगुटे वाळविणे हा असे. सर्व माळ रंगीबेरंगी पट्ट्यांनी भरून जाई. ठिकठिकाणी पेटलेल्या चुलीतून सदागती निळसर धूर व हलणाऱ्या ज्वाला दुपारच्या उन्हात तरळत वर जाऊन चित्रातील स्थिर पार्श्वभूमीवर उठून दिसत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत टाळ-मृदुगांचा आवाज व तुकाराम, ज्ञानदेव, एकनाथ, नामदेव, ह्यांचे अभंग कधी गोड गळ्यांनी म्हटलेले. कधी तर ओरडून तारस्वरात म्हटलेले कानात भिनून जात. रात्रीच्या मुक्कामी बिहाडात, चार भिंतीत जे भजन होई तेथे आवाजाचा बेसूरपणा व टाळांचा कट ठणठणाट ऐकून मन खिन्न होई; पण दिवसा मोकळ्या रस्त्यावर टाळांचा आवाज कधीच असहनीय झाला नाही. अभगाचे शब्द ऐकून त्यांच्या अवीट गोडीत मन इतके रंगून जाई की, आवाजातील गोडीचा तेवढा आस्वाद घेऊन बेसूरपणा विसरण्याची प्रवृत्ती हाइ. रस्ताभर पहाटेचे काही तास वगळन वारा भिणभिण वाहत असायचा. नानघताना हौशीने मला सांगितलेच होते की, “बाई, छत्री नेऊन काही फायदा नाही. वारा इतका बेफाट सटतो की, ती उघडून धरताच येत नाही." अत्यतर आले. मी म्हटले. "बरे झाले छत्री आगगाडीत विसरले!" पनि हालणारे बायकांचे पदर, झाडांच्या फांद्या शेतात कुठे-कुठे पेरलेला मिळवा ह्यांनी त्या अखंड चाल चालणाऱ्या माणसाची गती जास्तच भासे, आणि वरती ढगही सारखे वाऱ्याने भिरभिरत असायचे. मी एका रंगमय, दमय, वाऱ्याने भरलेल्या गतिमान अवकाशात सारखी पुढे-पुढे चालत त. खाली पाहिले की असंख्य पाय चालताना दिसायचे, वरती पाहिले की व्य डोकी टाळ-मृदंगांच्या तालात वर-खाली होत पुढे जाताना "यची. मला वाटे, ह्या जनप्रवाहातील मी एक बिंदू आहे. मी माझ्या