भूमीवर युद्ध चालले होते, त्यांच्या कुटुंबांची किती धूळधाण झाली असेल
त्याची कल्पनाच केलेली बरी. त्याच्याही मागे गेले तरी मुसलमान राजवट,
यादव, राष्ट्रकूट, चालुक्य, शातवाहन, अगदी ख्रिस्त शकाच्या पूर्वीपासूनचा
इतिहास म्हणजे दोन हजार वर्षांच्या लढायांचा व राज्यक्रांत्यांचा इतिहास
आहे. महाराष्ट्र इतरांशी लढत होता व इतर महाराष्ट्राशी लढत होते. सर्व
भारतभर राष्ट्राराष्ट्राचे लढे चालले होते. लढाई, अशांतता, झगडा ही
राष्ट्रांची नेहमीची प्रकृती होती व दीर्घकालीन शांतता हीच विकृती होती. जी
लढाईत मरत नसत अशा अर्भकांना पटकी, देवी, उपासमारी घेऊन जात.
पण इंग्रजांच्या राज्यापासून ही स्थिती पार बदलली. सबंध देशभर शंभर
वर्षांवर शांतता नांदली; पेंढारी वगैरे लुटारूंचा नायनाट झाला. अंतर्गत युद्धे
मुळीच नव्हती व बाहेरचे वैरीही नव्हते. अशी राजकीय परिस्थिती संबंध
मानवेतिहासात पूर्वी कधी कोणत्याही राष्ट्राला मिळाली नाही.
पाश्चिमात्त्यांच्या वैद्यकीय ज्ञानात जी भर पडली तिचा फायदा आपोआपच
भारताला मिळाला. सबंध गावेच्या गावे निर्मनुष्य करणाऱ्या पटकी, देवी
वगर रोगांवर ताबडतोब इलाज होऊ लागला. पोस्टाच्या सोयीने एका
प्रांतात जे काय चालले असेल त्याची बातमी थोडक्या वेळात दुसऱ्या
प्राताना मिळू लागली. आगगाड्यांमुळे इकडचे धान्य तिकडे हालवता येऊ
लागले. हिंदुस्थानात दरवर्षी कोठे ना कोठे तरी अतिवृष्टीमुळे वा
अनावृष्टीमुळे दुष्काळ हा असतोच; पण इंग्रजांच्या वेळेपासून एका प्रांतातले
धान्य दुसरीकडे जाऊ लागले व दुष्काळामुळे होणारे मृत्यू बरेचसे टळले.
बालमृत्यूचे प्रमाण मोठे असले तरी पूर्वी तरुण पुरुष लढाईत, साथीत किंवा
उकाळात जे बरेचसे मरत ते मरेनासे झाले. शांततेमळे स्त्रियांना व कुटुंबाना
स्वास्थ्य लाभले व प्रजोत्पादनाच्या मार्गातील सर्व आडकाठी दूर होऊन
यूच मागे मात्र बरेचसे बंद झाले. भारताच्या बहतेक विभागांचे हवापाणी
जन आहे की, वस्त्रप्रावरण फारसे नसले तरी चालते. घरेही अगदी तुटपुंजी
असली तरी तेवढा निवारा परतो व अशा भूमीवर प्रजोत्पादनाची
प्रयोगशाळाच जणू स्थापन झाली.
इग्रजांच्या राज्यस्थापनेपासन आतापर्यंत भारताची भूमी तितकीच
शाहली... नव्हे, फाळणीमळे संकोचच पावली आणि प्रजा मात्र दुप्पट झाली.
। ता फार झाली असे वाटत नाही, वाटत असले तरी कोणी तसे
बोलत नाही. कारखानदारांना वाटते. जेवढी जास्त लोकसंख्या तेवढी मजुरांची
पान:Paripurti.pdf/107
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
परिपूर्ती / १२१