पान:Paripurti.pdf/10

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१२ / परिपूर्ती
 

तिसऱ्या वर्गाच्या डब्यांत बसलो होतो. गडी पॅरिसमधील एका स्टेशनवर उभी होती व प्लेटफॉर्मवर प्रवासी व स्यनां पोचवायला आलेली मंडळी ह्यांची ऍक गेंद उसळली होती. ओमच्याबरोबरच्या प्रवाशाने माहिती दिली की, ह्या गाडीने खूप तरुण शिपाई लांबच्या वसाहतीला जावयास निघाले आहेत व त्यांना पोचवण्यासाठी फार लांबून कुटुंबातील मंडळी आली आहेत, शिपाई अंगदी पोरसवदाच दिसत होते आणि प्रत्येकाला पोचवायल आईबाप; भावंडे, मम, चुलता, बायको वा प्रेयसी आणि तिची मातापितरे अशी सात-आठ माणसे तरी दिसत होती. पुरुष गंभीरपणे बालत होते; बायका अधूनमधून रडत होत्या, अधूनमधून हसत होत्या; दरं क्षणं दानं क्षणांनी मुके घेणे चालले होते आणि विशेष म्हणजे पुरुष-पुरुषही वारक भेटतात तसे भेदून एकमेकांचे मुझे घेत होते. इतक्यात घंटा झाली. गार्डने हिरवे निशाण दाखवले, आणि लॅटफॉर्मवर निरोप देण्याची एकच गर्दी उसळली. प्रत्येक शिपायांवर त्याच्या सर्व नातेवाईकांनी संशब्द मुकयांचा असा एकदम भडिमार केला की, "ओम्हीं त्या आवाजाने दचकलोच चुंबनाचा ध्वनी कधी एवढा मोठा होऊ शकेल ही कल्पनाहीं तोपर्यंत आम्हाला शिवली नव्हती. आम्हाला जे हसू लोटले ते आवरेंच ना. आमच्या शेजारचे लोक म्हणत असतील की, काय पाषणहृदयी हे पौर्वात्य! असल्या करून प्रसंगी रंडू येण्याऐवजी ते आपले हंसतचे आहेत!
 मी मायदेशी परत आले त थटती थेट माहेरी आले. ओल्याबरोबर वाकून आईच्या पाया पडले. तिच्या डोळ्यातून पुर वाहत होता. माझेही डोळे भरून आले होते. इतक्यात माझे वडील आले. त्यांनाही नमस्कार केला. तो त्यांनी माझे खांदे धरून मला उठवले, माझ्याकडे एकदा नीट पाहिले व मी रडते आहेसे पाहून म्हंटले, "अहो जावई, तुम्हाला वाटल की, ही बया विलायतेला जाऊन शहाणी होईल. मी सांगत नव्हतो ही रादुबई मूर्खच राहणार म्हणून? गेली तशी परत आली!" त्यांनी माझ्या पाठीवर थाप मारली. भावनेने कुंद झालेले वातावरण कसे एकदम लख्ख झाले. सगळीजण हसली. मला काय हुक्की आली कॉन जाणे, मी आईजवळ जाऊन "हे गं काय?" मी काही बोलायच्या आतच वडील म्हणाले, 'अग हे विलायती चाळे!"
  याहीनंतर काही वर्षे लोटली. आम्ही सर्व भावंडे जमलो होतो.