पान:Ganitatalya gamatijamati.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




२०. ओली - सुकी

 जेव्हा दोन पर्याय समोर असतात आणि कुठला निवडावा यासाठी निर्णायक कारण उपलब्ध नसतं तेव्हा चिठ्या टाकणे किंवा नाणेफेक अशा उपायांचा अवलंब केला जातो. अशा उपायांमागे अभिप्रेत असते समान संभाव्यता (Equal Probability) उदाहरणार्थ, नाणं व्यवस्थित फेकले की ते हवेत फिरून खाली पडताना 'हेड वर’ का ‘टेल वर’ पडेल ते सांगता येत नाही - दोन्ही पर्याय सारखेच संभवनीय असतात. ही संभाव्यता गणितात मोजता येते. त्यासाठी केलेले नियम ह्या उदाहरणाने सांगता येतील.

 जी घटना निश्चित घडणार तिची संभाव्यता १ (एक) इतकी धरली जाते. नाणेफेकीत नाणं खाली पडणार ह्या घटनेचे पृथक्करण केल्यास तिचे दोन पर्याय म्हणजे, ‘नाणे हेड वर असलेल्या परिस्थितीत खाली पडेल’ आणि ‘नाणे टेल वर असलेल्या परिस्थितीत खाली पडेल' असं दिसून येते. त्यांची संभाव्यता सारखी हे आपण आधीच पाहिलं. शिवाय हे परस्पराला वगळणारे आहेत (हेड वर आणि टेल वर एकदम घडणार नाही.) म्हणून त्यांच्या संभाव्यतांची बेरीज केल्यास ती मूळ घटनेच्या (‘नाणे खाली पडेल') संभाव्यतेइतकी झाली पाहिजे. त्यावरून प्रत्येक पर्यायाची संभाव्यता १/२ (अर्धी) आहे हे दिसून येतं.

 ही संभाव्यता (किंवा कुठल्याही घटनेची संभाव्यता) मोजायला