पान:Ganitatalya gamatijamati.pdf/5

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


प्रास्ताविक


 पूर्वी 'किर्लोस्कर'मध्ये सदर रूपाने प्रसिद्ध झालेली लेखमाला आता सुधारित रूपात पुस्तक म्हणून प्रसिद्ध होत आहे याचा मला आनंद वाटतो. गणितातील गमती जमती वाचून वाचकाला गणिताबद्दल आपुलकी वाटेल. निदान त्याचे कुतूहल तरी वाढेल अशी आशा आहे. लेखमालेला ‘किर्लोस्कर'च्या वाचकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. पुस्तकरूपाने ती अधिक वाचकांना सुलभ करून दिल्याबद्दल मी श्री. अरविंद पाटकर यांचे आभार मानतो.

- जयंत नारळीकर

'आयुका' पुणे ४११ ००७