पान:Ganitatalya gamatijamati.pdf/22

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गणितातल्या गमती जमती
१५


गुणाकार भागाकार करायची त्याची तयारी होती. मग त्याच्याकडून गुणाकार कसा करून घ्यायचा? शेवटी त्याच्या वडिलांनी एक युक्ती योजली. आपल्या चिरंजीवांना बेरीज-वजाबाकी आणि २ ने गुणाकार-भागाकार येवढंच येतं याचा विचार करून त्यांनी त्याला खालील पद्धत शिकवली. ती पद्धत एका उदाहरणाने समजावून घेऊया.

 ७ x १७ = ११९

 हा गुणाकार कसा करायचा ?

 कागदाच्या एका बाजूला १७ आणि दुस-या बाजूला ७ लिहा. नंतर १७ ला २ ने भागा आणि ७ ला २ ने गुणा आणि त्या त्या आकड्यांच्या खाली लिहा.

 १७   

   १४

 ह्यात १७ ला २ ने भागल्यावर उरलेली बाकी १ असते. पण तिकडे दुर्लक्ष करा. हाच प्रकार पुढे चालू ठेवा. अखेर डावीकडे फक्त १ येतो.

  १७   
     १४ <---
     २८ <---
     ५६ <---
     ११२ <---


 आता डावीकडल्या स्तंभात २ ने भाग जाणारे जे जे आकडे असतील त्यांच्या समोरच्या उजव्या स्तंभातील संख्या बाजूला काढा. वर त्या संख्या बाणाने दाखवल्या आहेत. उरलेल्या संख्यांची बेरीज म्हणजेच हवे असलेले उत्तर.

   

  + ११२

  -----------

  ११९