पान:Ganitatalya gamatijamati.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४
गणितातल्या गमती जमती


१० अशी लिहितो तसेच अष्टांक पद्धतीत ‘आठ' लिहायला १० वापरावे लागतील. ह्याच पद्धतीत ‘सतरा' म्हणजे २१, इतर संख्या वाचकांनी अष्टांक पद्धतीत लिहून पहाव्यात.

 हे संख्या लिहिण्याचं काम आपण दहा ऐवजी आठ अंकांनी करू शक़तो. हेच काम कमीत कमी किती अंकांनी होईल? कमीत कमी दोनच अंक लागतील : ० आणि १. ह्या दोन अंकांचे अंकगणित कुठलीही संख्या लिहिण्यात किंवा त्यांची बेरीज-वजाबाकी, गुणाकार-भागाकार करण्यात आपल्या नेहमीच्या अंकगणिताइतकेच क्षम आहे.

  ३ x ७ = २१

 हा गुणाकार दोन अंकांच्या अंकगणितात कसा दिसेल?

   ११
  x १११
 ---------------------------

    ११

    ११

   ११

 ---------------------------

  १०१०१

 हा गुणाकार नेहमीच्या बाळबोध पद्धतीनेच केलेला आहे; फक्त १ पलीकडे गेले की दोन = १० हे ध्यानात ठेवावं लागतं.

 आधुनिक गणकयंत्रांना ० आणि १. ह्या आकड्यांची कल्पना वर सांगितलेल्या 'स्विच' च्या उदाहरणाने दिली जाते. त्यामुळे ते ह्या दोन आकड्यांच्याद्वारेच कुठलीही संख्या लिहितात. आपणही हे दोनच आकडे का वापरत नाही? अर्थात दहा अंकांची आपल्याला सवय आहे हे कारण सोडले तरी व्यवहाराच्या दृष्टीने कुठलीही संख्या ह्या दोनच आकड्यात खुपच लांबलचक होते हे वरील गुणाकाराच्या उदाहरणाने लक्षात येण्याजोगं आहे.

आळशी मुलाची गोष्ट :

एका गणित्याचा मुलगा स्वभावाने आळशी होता. तो काही करू गुणाकार शिकायला तयार होत नव्हता. फार तर २ ह्या आकड्याने -