पान:Ganitachya sopya wata.pdf/94

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 वर्तुळाचे क्षेत्रफळ काढणें मात्र जरा अवघड आहे. कारण वर्तुळाचे भाग त्रिकोणांत पाडता येत नाहीत. तरी वर्तुळाच्या क्षेत्रफळाचाही नियम आहे. तो तुम्ही सिद्ध करू शकणार नाही. परंतु तो लक्षात ठेवून त्याप्रमाणे दिलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ तुम्ही काढू शकाल.

गणिताच्या सोप्या वाटा (Ganitachya Sopya Wata).pdf


समजा आपल्याजवळ r त्रिज्या असलेलं वर्तुळ आहे. मग त्याचे क्षेत्रफळ हे π r2 एवढ असतं. π हे ग्रीक अक्षर आहे व त्याचा उच्चार 'पाय' असा करायचा. π ची किंमत अगदी तंतोतंत अशी व्यवहारी अपूर्णाकात लिहिता येत नाही. पण ती किंमत 22/7 च्या खूप जवळ आहे म्हणून गणिते सोडवताना π = 22/7 घेतात. मग वर्तुळाचे क्षेत्रफळ = 22/7 x r2 एवढे होते. उदाहरणार्थ 3 सें. मी. त्रिज्या असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ 22 x 9/7 चौ. सें.मी. = 198/7 चौ. सें.मी. = 28 2/7 चौ. सें.मी.

7 सें.मी. त्रिज्या असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ

= 22/7 x 7 × 7 चौ. सें.मी.

= 154 चौ. सें.मी.

 आतां वर्तुळ, त्रिकोण, चौकोन, इतर बहुभुजाकृती यांचे क्षेत्रफळ तुम्हाला काढता येते. या आकृत्यांचे परीघ तुम्हाला मोजता येतात का?

९२
गणिताच्या सोप्या वाटा