पान:Ganitachya sopya wata.pdf/68

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेकरताना आपण अंशा अंशाचे व छेदा छेदांचे गुणाकार करतो. अशा वेळी अंश व छेद यांच्या सामायीक अवयवाने अंश व छेद दोघांना भागून संक्षिप्त रूप देता येते म्हणजेच उत्तरातील अपूर्णाक फार मोठ्या आकड्यांचा न ठेवता शक्य तेवढ्या लहान संख्यांचा होतो.

जसे 4/9 x3/1 = 4 x 3/9 अंश व छेद दोघांत 3 हा अवयव आहे, त्याने भागून

4 x 3/9 = 4/3 हे संक्षिप्त रूप आले.
5/12 x 3/2 = 5 x 3/12 x 2 = 5/4 x 2 = 5/8   (इथे 3 या सामायिक अवयवाने अंश व छेद यांना भागले)

दोन अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी करतांना दोन्ही अपूर्णांकाचे छेद समान ठेवून मग अंशांची बेरीज किंवा वजाबाकी करायची असते हे विसरू नका.

अधिक व उणे संख्यांचा किंवा धन व ऋण संख्यांचा गुणाकार करताना हे नियम विसरू नका.

(धन) x (धन) = धन, (धन) x (ऋण) = (ऋण)

(ऋण) x (ऋण) = धन, (ऋण) x (धन) = (ऋण)

जसे भागाकार म्हणजे उलटा करून गुणाकार तसेच एखादी बहुपदी वजा करणे म्हणजे चिन्ह बदलून बेरीज करणे हेही लक्षात ठेवा. वेगवेगळ्या बहुपदीसाठी कंस वापरा व एखाद्या बहुपदीचे चिन्ह बदलायचं म्हणजे त्यातील प्रत्येक पदाचे चिन्ह बदलायचं हेही विसरू नका. दोन बहुपदींचा गुणाकार करताना कंस वापरा व ते हळू हळू, एका वेळी एक कंस याप्रमाणे सोडवा.

उदा. (m-3n+4) व (2m+n) या दोन बहुपदीचा गुणाकार करा.

(m-3n+4) x (2m+n) हा गुणाकार करताना प्रथम पहिला कंस सोडवू व मग दुसरा.

६६
गणिताच्या सोप्या वाटा