पान:Ganitachya sopya wata.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



= 48 x 6 = 288 रु.

∴ 600 रु. मुद्द्लावर 4 वर्षात 288 रु. व्याज द्यावे लागेल.

उदा. 2 सुलोचनाने द. सा. द. शे. 15 रु. दराने कर्ज काढले 2 वर्षांनी ते फेडतांना तिला 450 रु. व्याज द्यावे लागले तर तिने किती कर्ज काढले होते ?

इथे मुदत 2 वर्षे आहे म्हणून 100 रु. वर 2 वर्षात किती व्याज द्यावे लागेल ते पाहू. 100 रु. वर एक वर्षात 15 रु. व्याज
∴ 100 रु. वर दोन वर्षांत 15 x 2 = 30 रु. व्याज द्यावे लागेल.
आतां सुलोचनाचे मुद्दल म मानू व हे गुणोत्तर दोन प्रकारांनी मांडले तर
30/100 = 450/ हे समीकरण मिळते.

∴ 30 म = 450 × 100  (दोन्ही बाजूं ना 100 म ने गुणले)

∴ म = 450 x 100/30 = 1500

(इथे 450 x 100/ करताना अंश व छेद दोघांनाही प्रथम 10 ने भागले की 45 x 100/3 मिळतात. मग पुन्हा 3 ने अंश व छेद दोघांना भागले की 15 x 100 = 1500 हे उत्तर मिळते. चटकन गुणाकार करताना लक्षात ठेवा की अंश व छेद या दोघांच्याही गुणकांत एकक, दशम स्थानी, म्हणजे उजव्या बाजूस शून्ये असली तर अंश व छेद या दोघांतूनही अशी शून्ये सारखीच, काढता येतात म्हणजे अंशाच्या गुणकांतून जेवढी शून्ये काढायची तेवढीच छेदाच्या गुणकांतूनही काढायची.)

उदा. 3 द. सा. द. शे. 10 दराने उ600 रु. मुद्दलाचे 1440 रु.

३६
गणिताच्या सोप्या वाटा