पान:Ganitachya sopya wata.pdf/36

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
∴ 221/2% नफा झाला.

आता सरावासाठी काही गणिते करा व ती करताना लक्षात ठेवा की

(1) नफा किवा तोटा हा नेहमी खरेदीच्या एकूण किंमतीवर मोजला जातो. म्हणजे शेकडा न नफा किंवा न% नफा असेल तर 100 रु. खरेदीवर न रु. नफा असतो.

(2) नफा/खरेदी, तोटा/खरेदी, खरेदी/विक्री, विक्री/नफा, तोटा/विक्री या अनेक गुणोत्तरांपैकी आपल्याला कुठलं गुणोत्तर विचारात घेणं फायद्याचं आहे, सोपे आहे ते गणित वाचून ठरवा.

(3) माहीत नसलेल्या रकमेसाठी अक्षर मानून गुणोत्तर प्रमाण दोन प्रकारांनी मांडा व समीकरण तयार करा. ते सोडवा व अक्षरांची किंमत काढा.

सरावासाठी गणिते -

(1) मोहनने 2 किलो तेलाचा डबा 45 रु. ना घेतला. तो फुटल्यामुळे काही तेल गळून गेले. उरलेले तेल त्याने 36 रु. ना. विकून टाकले. त्याला या व्यवहारात किती टक्के तोटा झाला ?

(2) सूर्यकांतने एक डझन फौंटन पेने 30 रु. ना. घेतली व ती प्रत्येकी 3 रुपयास विकली. त्याला नफा किती टक्के झाला ?

(3) रमेशने एक टी. वी. सेट 3000 रु. ना. घेतला त्याला 15% नफा हवा असेल, तर त्याने तो सेट किती रुपयांना विकावा ?

(4) 500 रु. क्विटल या दराने 5 क्विटल तांदूळ आणले. ते आणण्यासाठी गाडी भाडे 100 रु. द्यावे लागले. नंतर ते तांदळ = 4 रु. किलो या दराने विकले तर किती टक्के फायदा झाला ?

३४
गणिताच्या सोप्या वाटा