पान:Ganitachya sopya wata.pdf/29

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हे गणित दोन प्रकारांनी सोडवता येते.

प्रथम व ज्वारीची व गव्हाची खरोखर किती पोती आहेत ते काढू. ज्वारीचा पोती ज आणि गव्हाची ग पोती आहेत असे मानू ज्वारीची 35% आहेत म्हणजे एकूण पोती 100 असतील तर ज्वारीची पोती 35 आहेत. ∴ ज्वारीची पोती/एकूण पोती = 35/100

∴15000 पोत्यांपैकी ज्वारीची ज आहेत.

35/100 = /15000

∴ज = 35/100 x 15000 (बाजूंची अदलाबदल करून दोन्ही बाजूना 15000 न गुणले.

ज = 5250

त्याचप्रमाणे गव्हाची पोती 30% म्हणजे एकूण पोती 100 असल्यास गव्हाची 30 आहेत गव्हाची पोती ग आहेत असे मानल्यास

गव्हाची पोती/एकूण पोती = 30/100 = /15000
/15000 = 30/100
∴ग= 30/100 x 15000 = 4500

आता गव्हाची पोती 4500

ज्वारीची पोती 5250

∴गव्हाची व ज्वारीची मिळून पोती 9750 आहेत व इतर धान्याची

15000
- 9750
----------
5250 आहेत.
5250 पोती इतर धान्याची आहेत.
हे गणित दुस-या प्रकाराने करताना गव्हाची व ज्वारीची किती
शेकडेवारी
२७