पान:Gangajal cropped.pdf/75

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गंगाजल / ८०

 लोकांचे लक्ष लागलेले आहे पन्नाशीच्या आसपास वय झाले, म्हणजे शक्य तितक्या कमी क्लेशांत वडील माणूस नाहीसे करून टाकणे खरोखर कठीण नाही. आमके-एक वय झाले की लगेच त्या दिवशी त्याला मरणाचे बक्षीस द्यावयाचे, इतका क्रूर व तडकाफडकी प्रकार न करिताही योजनाबद्ध रीतीने पन्नास वर्षावर आयुष्य असलेला मनुष्य समाजातून नाहीसा करून टाकावयाचा, अशी युक्ती योजिता येईल. एखाद्या डोकेबाज संख्या- शास्त्रज्ञाला हा विषय दिला, तर मला वाटते, महिन्याभरात तो ह्याचे उत्तर देऊ शकेल. पन्नास वर्षांच्या वर वय असलेल्या माणसांची एक यादी करावयाची. तीमध्ये दरवर्षी किती भर पडते हे समजू शकते. सध्या फुगलेली ही संख्या व नवीन येणारे, असे मिळून एक दहा वर्षांत सगळ्यांना नाहीसे करावयाचे म्हटले, तर तो शास्त्रज्ञ कुठच्याही त-हेची दया, लोभ, आपलेपणा वगैरे न दाखविता कोणते नंबर मारावयाचे, ते ठरवून देईल. ह्या नंबरांच्या चिठ्या सार्वजनिक रीतीने काढाव्या, नाही तर गुप्त रीतीने. आणि एकदा एका वर्षाचे नंबर मिळाले की ह्या-ना-त्या प्रकाराने वर्ष संपावयाच्या आत त्यांना नाहीसे करावे,- कोणाला सुई टोचून, कोणाला औषध देऊन, कोणाला काही खावयाला देऊन, कोणाला काही प्यावयाला देऊन. प्रसंगाप्रमाणे योग्य ते उपाय योजून त्यांना नाहीसे करणे शक्य आहे. ह्यामुळे फार फायदे होणार आहेत.

 जुगाराची चटक लागलेल्या राज्यकर्त्यांना व प्रजेला जुगार खेळायला एक नवी संधी मिळणार आहे. यंदा कोणते बरे म्हातारे जाणार आहेत? पुढच्या आठवड्यात कोण जाणार आहेत? -हे ओळखणा-यांना पहिले बक्षीस जाहीर करिता येईल. म्हातारी माणसेसुद्धा जाताना कोणालातरी द्रव्य देऊन जातील!

 संतप्त तरुण नाहीतसे होतील. कारण ज्यांच्यावर दात-ओठ खावयाचे ज्यांची मूल्ये चुकली म्हणून आरडाओरडा करावयाचा, ती पिढीच मुळी नाहीशी झालेली असणार. सर्वच त-हेचे मोर्चे कमी होतील. कारणे दोन : ज्यांच्याविरुद्ध मोर्चा न्यावयाचा, असे कोणी उरणार नाही; आणि ब-याचशा तरुणांवर आयुष्याच्या जबाबदा-या पडल्यामुळे अजून मुलेच असलेले असे तरुण मोर्चात सामील व्हावयाला राहणारच नाहीत.

 हातचे एक शस्त्र नाहीसे झाले, म्हणून राजकीय पक्षांना व पुढार्‍यांना वाईट वाटण्याची शक्यता आहे. पण त्यांनी विचार केला, तर असे दिसेल