पान:E-Book 100 Common Birds in Maharashtra Marathi (2).pdf/71

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्रातील १०० सामान्य पक्षी
डॉ. राजू कसंबे : 2015


पिंगळा
महाराष्ट्रातील १०० सामान्य पक्षी (Maharashtratil 100 Samanya Pakshi).pdf
(छाया: नंदकिशोर दुधे)

मराठी नाव: पिंगळा.

इंग्रजी नाव: Spotted Owlet. शास्त्रीय नाव: Athene brama. लांबी: २१ सेंमी. आकारः साळुकीएवढा. ओळख: ह्याच्या पंखांवर, पाठीवर तसेच मुकुटावर पांढरे ठिपके असतात. खालील बाजू मळकट असून त्यावर तपकिरी ठिपके असतात. चेहेरेपट्टी फिक्कट असून मागील बाजूस फिक्कट गळपट्टी असते. पहाटे, सायंकाळी तसेच रात्री क्रियाशील असतो. आवाज: किंचाळल्याप्रमाणे कर्कश चिरुर-चिरुर-चिरुर' आणि लगेच केलेला ‘चिवक-चिवक-चिवक', व्याप्तीः रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: शेतीप्रदेश, गावखेड्याजवळ तसेच जंगलात. खाद्यः मुख्यत्वे कीटक, कधीकधी छोटे पक्षी, छोटे उंदीर, सरडे, इ.

1

७१