पान:Bhovara-Iravati Karve.pdf/8

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
८ / भोवरा
 

म्हणून तळमळतो. लाइबनिट्झच्या मोनाडांप्रमाणे जोपर्यंत प्रत्येक आत्मा वेगळाला राहतो तोपर्यंत भेट होणे शक्यच नाही असे मानतो. ज्या दिवशी देहात, अस्मितेत कोंडलेला आत्मा सुटेल, त्या दिवशी अनंताच्या जाणिवेत वेगळेपण विरलेलेच असणार. पण तोपर्यंत ही निराळेपणाच्या विरहाची हुरहूर आमच्या मनात कायमच राहते. पण त्याच भोवऱ्याच्या वरच्या कडेला सर्व इतके गतिमान आहे की कोणताही एक बिंदू कोणत्याही एका बिंदूशेजारी फार वेळ राहूच शकत नाही. फिरण्याची कक्षा म्हणजे एक लांबच लांब प्रचंड मोटर रस्ता आहे. त्यावर असंख्य मोनाड निरनिराळ्या दिशांनी जात येत आहेत. प्रत्येक मोनाड आपल्या खिडकीतून इतरांकडे पाहातो, हात हालवतो व म्हणतो “झाली हं आपली भेट!"

१९६०

*