पान:Bhovara-Iravati Karve.pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१४४ / भोवरा

झाली. निरनिराळ्या शास्त्रज्ञांनी ह्या प्रकारची उपपत्त लावण्याचा प्रयत्न केला. शेवटी फ्रेडरिकने सांगितले की, "अहो, हाक तुम्हांला मारायच्या आधी मीच तो गोळा फिरवला होता, व उष्ण बाजू सावलीकडे व थंड बाजू उन्हाकडे केली होती."
 हा आप्तवाक्याचा महिमा पूर्वी होता; आणि आता नाही, असे मुळीच नाही. सत्यशोधनाची उपकरणे जशी वाढली तशी सत्य लपवण्याची साधनेही वाढली. सत्याचा पडताळा प्रत्येकाला पाहता येत नसल्यामुळे कोणाच्या ना कोणाच्या तरी शब्दावर भरवसा ठेवणे सध्या भाग पडते. पूर्वीचा व्यवहार बहुतांशी आपल्या भोवतालच्या, आटोक्यातल्या जगाशीच होता. आताचा व्यवहार जगद्व्याळ, सर्व जगाचा कानाकोपरा व्यापून राहिला आहे व त्या व्यवहाराचे आपले ज्ञान लिहिलेल्या किंवा बोललेल्या शब्दाच्या द्वाराच सकाळी उठल्यापासून निजेपर्यंत निरनिराळ्या लोकांचे शब्द कानांत घुमत असतात; किंवा डोळ्यांपुढे नाचत असतात. निरनिराळे विक्रेते आपला माल आणि आपली मते आकर्षक रीतीने मांडून खपवण्याचा प्रयत्न करीत असतात. नेसायला पंचवीस तर्हेची लुगडी, खायला निरनिराळ्या तसेच मिष्टान्ने, प्रकृती बिघडल्यास निरनिराळी औषधे, आपण स्वतः मेल्यास मुलांबाळांची सोय करणाच्या निरनिराळ्या विमा कंपन्या, निरनिराळ धार्मिक मते, एका बाजूने अमेरिकेचा आवाज तर दुसरीकडे रशियाचा अचार, ह्या शब्दब्रह्माच्या अफाट घोटाळ्यात खरे काय व खोटे काय; कोणावर विश्वास ठेवावा, कोणावर नाही, हे कळणे साधारण मनुष्याला. शक्य आहे का? शेवटी कोणाला तरी आप्त मानून त्याचे म्हणणे खर असेच बहुतेक लोक मानतात. व्यवहारात संशयात्म वृत्ती ठेवून भागत नाही. त्यामुळे कुठल्या तरी एका बाजूने निर्णय घ्यावा लागतो. हा निर्णय सत्यासत्याची छाननी करून घेतलेला नाही, विश्वासून घेतलेला आहे, इतकी कबुली देण्याइतपत सत्याची चाड बहुतेकांना नसते आप्तवाक्यावर एका बाजूने बुद्धिवादाचा डंका वाजवून दुसऱ्या बाजूने न पारखलेल्या मता स्वीकार करताना त्या मतांबद्दल नसता व अहंकार उत्पन्न होतो परमताबद्दल असूया व द्वेष पण बळावतो. म्हणून हल्लीचे लेखन व भाषण केवळ आपण मालाची जाहिरात करून राहात नाही ; तर इतरांबद्दल दोषही भडकवण्यास कमी करीत नाही.