पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/89

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[७७]

 पाहिजे, म्हणजे धान्यस्वरूपांत त्याचा व्यय किंवा नाश झाला पाहिजे तरच त्यापासून पुष्कळ धान्य उत्पन्न होईल. तसेंच मजुरींत देण्याचें भांडवलही मजुरांच्या खाण्यापिण्यांत खर्च झालें पाहिजे, तर मजुरांच्या मेहनतीच्या रुपानें संपत्तीच्या उत्पत्तीस त्याचा उपयोग होणार. कापूस किंवा कातडें हीं त्या स्वरुपांत नाहींशीं झालींच पाहिजेत. तर त्याचें कापड अगर बूट बनणार. सारांश, भांडवलाला सततचें आस्तित्व नसर्त. तें आपल्या पुनरुत्पत्तीच्या रुपानें राहूं शकतें. फार वर्षे त्याच स्वरूपामध्यें राहणारें भांडवल अगर संपत्ति कोणत्याही देशांत फारच थोडी असते. जमीन व फार झालें तर घरेंदारें व इमारती या टिकाऊ आहेत; परंतु त्यांनासुद्धां नेहेमीं दुरुस्त ठेवाव्या लागतात. तरच त्यांच्या हातून भांडवलाचा कार्यभाग होऊं शकतो.

 मिल्लचें चवथें प्रमेय नुसतें वादग्रस्त आहे एवढेच नव्हे तर सकृद्दर्शनीं तर तें विरोधाभासात्मक आहे. * मालाला मागणी म्हणजे श्रमाला मागणी नव्हे. ” हें विधान वस्तुस्थितीला, व्यवहाराला व नेहेमीच्या अनुभवाला प्रथमदर्शनीं अगदीं विरुद्ध आहे. कारण मागणी अगर खप हा तर व्यापाराचा व उद्योगधंद्यांचा आत्मा होय असें व्यवहारज्ञ समजतो. मागणी अधिक ह्मणजे धंद्याची तेजी व मागणी कमी ह्मणजे धंद्याची मंदी, अशी व्यवहारांत म्हणच आहे. या ग्रंथाच्या विवेचनांतही वासनांची वाढ अगर मागणी हें एक संपत्तीच्या वाढीचें गूढ व अदृष्ट कारण आहे असें दाखविलें आहे. तेव्हां या सर्व वस्तुस्थितीच्या उलट असें प्रमेय मिल्लनें कां व कसें प्रतिपादन केलें हें समजण्याकरितां मिल्लच्या विचारसरणींत किती गोष्टी गृहित धरल्या आहेत हें ध्यानांत आणलें पाहिजे. पहिली गोष्ट उद्योगधंद्यांस उपयोगी पडणारें देशांतील भांडवल मर्यादित असतें; दुसरी ही कीं, उद्योगधंद्यांची वाढ भांडवलावर अवलंबून असते; तिसरी श्रमाचा सर्व मोबदला अगर मजुरदारांची सर्व मजुरी संपत्ति उत्पन्न होण्याच्या आधीं दिली जाते व दिली गेली पाहिजे; चवथी गोष्ट माल मागणारा मालाच्या किंमतीचे पैसे आगाऊ देत नाहीं अथवा आपल्या संपत्तीला भांडवलाचें रूप देत नाहीं .पांचवी गोष्ट्र देशांतील भांडवल व श्रम यांचा नाश न होतां पाहिजे त्या उद्योगधंद्यांत तीं पुनः योजितां येतात. इतक्या सर्व गोष्टी अक्षरशः ख-या