पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[६०]

 व आपला धंदा फायदेशीर रीतानें करूं लागले. तसेंच किती तरी नवे उत्पादक धंदे आस्तित्वांत येऊ लागले आहेत.
 संपत्नीच्या उत्पत्तीची वर विवेचित अमूर्त कारणें यांकडे आभिमतपंथानें अगदीं कानाडोळा केला; किंवा यांचें अस्तित्व व महत्व हें त्यांच्या ध्यानांत नव्हतें व म्हणून त्यांनीं काढलेले पुष्कळ सिद्धांत खोटे व प्रत्यक्ष व्यवहाराला कुचकामाचे आहेत अशा प्रकारचे आक्षेप कांहीं आधुनिक ग्रंथकारांनीं काढलेले आहेत. रिकाडाच्या उदाहरणानें या शाखाला ज तर्किक स्वरुप आलें त्याचा परिणाम अर्थशास्त्रांतील कांहीं सिद्धांतांवर झाला खरा; परंतु हा आरोप अभिमतपंथाच्या जनकावर लागू करतां येत नाहीं. सर्व संपत्त्तीची अंतिम हेतु उपभोग किंवा व्यय आहे हें अडाॅम स्मिथ नें पुष्कळ ठिकाणी स्पष्टपणें सांगितलें आहे, इतकेंच नव्हे तर संपत्तीची वाढ ही खपावर किंवा मागणीवर अवलंबून आहे हेंही अॅडाम स्मिथला ठाऊक होतें व तें त्याच्या एका विधानावरून सिद्ध करितां येतें. अॅडम स्मिथनें आपल्या पुस्तकाच्या प्रथमारंभींच श्रमविभागाच्या तत्त्वाचा उहापोह केला आहे व या तत्वाचा संपत्तीच्या वाढीस केवढा मोठा उपयोग होतो हें सप्रमाण सिद्ध केलें आहे. परंतु श्रमविभागाचे तत्व अमलांत येणें हें बाजाराच्या परिघावर अवलंबून आहे असें त्यानें याच विवेचनांत सांगितलें आहे. म्हणजे कोणत्याही धद्यात श्रमविभागाचें तत्व अमलांत येणें न येणें हें खपावर किंवा मागणीवर अवलंबुन आहे. आतां श्रमविभागावर संपत्तीची वाढ अवलंबून आहे. अर्थात संपत्तीची वाढही खपावर किंवा मागणीवर अवलंबून आहे हे उघड झाले.
 यावरून अभिमतपंथाच्या प्रवर्तकांस हीं अमूर्त कारणें अश्रुतपूर्व होतीं व म्हणून त्यांची सर्व इमारत डळमळीत पायावर उभारलेली आहे, या आरोपास फारशी जागा नाहीं. वस्तुस्थािति अशी आहे की, हीं अमूर्तकारणे या पंथानें सुव्यवस्थित व प्रगतीच्या मार्गात असणाच्या समाजात असतात असें गृहीत धरून आपलें विवेचन केलें आहे. हीं अमृतकारणें स्पष्टपण सतत डोळ्यांपुढें न ठेवल्याकारणानें केव्हां केव्हां त्यांच्या विवेचनांत व विचारसरणींत चुक्या झाल्या आहेत, ही गोष्ट खरी वं अशा चुक्या दाखविणें निराळे व त्यांचे सर्वच ग्रंथ केराच्या टोपलीत