पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/62

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[५०]


उत्पत्नीसंबंधीं ज्या ज्या उपपत्ति पुढें आल्या आहेत त्या वास्तविक एकमेकींना विरोधी नाहींत तर त्या एकमेकींच्या पूरक आहेत. ह्मणजे प्रत्येक उपपत्तीमध्यें संपत्नीच्या एकेक कारणाचा निर्देश केलला आहे.
 तेव्हां या वादविवादांतील बराच घोटाळा व गोंधळ संपत्तींच्या कारणांचें वर्गीकरण करण्यापासून नाहींसा होणार आहे असें आह्मांस वाटतें व ह्मणून आम्हीं संपत्तीच्या कारणांचे दोन पोटभेद खालील विवेचनात केल आहेत.
 अर्वाचीन शास्त्रीयदृष्ट्या एखाद्या कार्याच्या उपपत्तीला ज्या ज्या गोष्टी अवश्य असतील ह्मणजे ज्यांचेवांचून कार्योत्पत्ति होणार नाहीं, त्या सर्वाचा एकाच 'कारण' या संज्ञेमध्यें अंतर्भाव होतो हें खरें आहे; तरी पण कांहीं कांहीं शास्त्रांच्या सोयीकारतां कारणांचें वर्गीकरण करण्याची पद्धति आहे. उदाहरणार्थ, वैद्यकशास्त्रांत रोगाचीं प्रत्यक्ष कारणें व रोगाकडे कल असणारीं कारण असा भेद करतात. तसेंच पुष्कळ ठिकाणीं अप्रत्यक्ष कारणें व प्रत्घक्ष कारणें असा भेद करतात; परंतु हा भेद शास्त्राला धरून नाहीं. कारण अप्रत्यक्ष कारणें ह्मणजे कारणांचीं कारणें होत: तरी पण एखादया विषयाच्या सोयीकरितां असा भेद करण्यास हरकत नाही. या न्यायानें येथें अर्थशाखाच्या विवेचनाच्या सोयीकरितां कारणांचे अमूर्त व मूर्त असे दोन वर्ग केले आहेत. मूर्त कारणें हीं चटकन् ध्यानांत येणारीं कारणें होत. कारण तीं जडस्वरूपी असल्यामुळें वरवर पहाणाराच्याही तेव्हांच लक्षांत येतात. अमूर्त कारणें हीं जडस्वरूपी नसल्यानें तितकीं चटदिशीं लक्षांत येत नाहींत. मूर्त कारणें हीं दृगोचर असतात; तर अमूर्त कारणें हीं दृश्या दर नसतात. ज्याप्रमाणें वृक्षाचा वरचा भाग स्पष्ट दिसतो; परंतु मुळें जमिनींत खोल असल्यामळें सहज दिसत नाहींतें; त्याप्रमाणें अमूर्त व मूर्त कारणांचाही संबंध आहे. या भेदांचें स्पष्टीकरण एक दोन दाखव्ल्यांवरून सहज होईल. वृक्षाच्या वाढीचीं मूर्त कारणें ह्मणजे पाणी,खत व माती हीं होत. हीं सहज दृश्य असून तेव्हांच ध्यानांत येतात. या वाढीचीं अमूर्त कारणें म्हणजे हवा व उष्णता हीं होत. र्ह पहिल्याइतकीं लौकर ध्यानांत येत नाहींत. ह्मणूनच या अमूर्त कारणांचा शोध मूर्त कारणांचे मागून लागला आहे. विस्तवाचें मृत कारण जळण होय; तर अमूर्त कारण हवा होय. पाणी वर काढण्याच्या पंपाच्या यंत्रामध्यें