पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/54

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.[४२]


 याप्रमाणें मृगयावृत्ति, गोपालवृत्ति, कृषिवृत्ति व उद्योगवृत्ति अशा समाजाच्या चार अवस्था समाजशास्त्रज्ञ मानतात. समाजाची औद्योगिक प्रगति या क्रमानें झालेली दिसून येते व सुधारलेलीं युरोपांतील राष्टें हीं हल्ली शेवटच्या अवस्थेप्रत येऊन पोंचलेलीं असून त्यांची औद्योगिक बाबतीत सारखी प्रगति चाललेली आहे. युरोपांतील राष्ट्रें उद्योगवृत्तीच्या पूर्वीच्या सर्व वृत्तींमधून बाहेर आलेलीं आहेत.
 हिदुस्थानच्या पुराणप्रियतेमुळे म्हणा किंवा हिंदुस्थानांतील हिंदूंच्या जातिभेदानें म्हणा किंवा हिंदुस्थानच्या विस्तारामुळे म्हणा, परंतु हिंदुस्थान देशाचा हा एक विशेष आहे कीं, वर निर्दिष्ट केलेल्या व युरोपांत एकामागून एक झालेल्या समाजाच्या निरनिराळ्या अवस्था या येथें एकसमयावच्छेर्देकरून प्रत्यक्षपणें पहावयास सांपडतात. हिंदुस्थानामध्यें अनादि कालापासून मृगयावृत्तीनें राहणा-या जाती आहेत. अर्थात या जाती समाजाच्या पहिल्या अवस्थेपुढें आजतागाईत गेलेल्या नाहींत. अशा जाती म्हणजे हिंदुस्थानच्या निरनिराळ्या डोंगराळ प्रदेशांत राहणा-या कातवडी, भिल्ल वगैरेसारख्या आर्यलोक येथें येण्यापूर्वीच्या मूळ रहिवाशांच्या जाती होत. या जातींचें अजूनही मुख्य उपजीविकेचें साधन म्हणजे शिकार व रानांत अनायासें सापडणारीं फळेंमुळें होत. यांचीं शिकारीचीं हत्यारें म्हणजे तीरकामठा व गोफण हीं होत. या जाती काटक्याकुटक्यांच्या केलेल्या झोंपड्यांत राहतात. या लोकांना इंग्रज सरकारनें फुकट जमिनी देऊन शेतकी शिकविण्याचा प्रयत्न चालविला आहे व खानदेशासारख्या कांहीं ठिकाणीं तो थोडाफार यशस्वी होत चालला आहे; परंतु या जातीच्या स्वाभाविक आलस्यामुळे त्यांना औद्योगिक प्रगतीच्या वरच्या अवस्थेप्रत आणणें हें काम बरेंच कठीण असतें. वंशपरंपरेनें गोपालवृत्तीत राहणाच्या जातीही हिंदुस्थानांत पुष्कळ आहेत. युरोपामध्यें जीप्सी म्हणून जे गोपालवृत्तीनें राहणारे लोक होते हेही आशियांतीलच किंवा कदाचित हिंदुस्थानांतून गेलेले असतील. हिंदुस्थानांत वडारी, वैदू, धनगर वगैरे जाति अजून गोपालवृत्ति आहेत. या जातींना कायमचीं घरें करून राहणें आवडत नाहीं; गुरेंढोरें बाळगावीं, शेळ्यामेंढ्या पाळाव्या व आपआपल्या गुरांच्या सोईप्रमाणें व काम मिळेल त्याप्रमाणें प्रांतोप्रांती हिंडत राहावें हाच यांचा सतत क्रम. हिंदुस्थानांतील बहुजन-