पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/525

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ५०९ ] कंपनी सरकारचा अंमल इकडे सुरू होण्यापूर्वी इकडील शेतक-यांची ब-यापैकीं स्थिति असावी असें म्हणण्यास पुष्कळ जागा आहे. कारण कंपनी सरकारच्या काळच्यापेक्षा त्या काळचे सारे जास्त दिसतात तरी त्यांबद्दल दोन गोष्टी लक्षांत ठेवल्या पाहिजेत. एक कागदोपत्री जरी कमाल दर जास्त दिसतात तरी प्रत्यक्ष अंमलबजावणींत ते कडक तहेनें घेतले जात नसत. शिवाय सारा पैशांत घेण्याची वहिवाट नव्हती तर प्रत्यक्ष शेतीच्या उत्पन्नाचा कांहीं वांटा घेण्याची पद्धति होती. यामुळे दुष्काळाच्या किंवा कमी पिकाच्या सालीं आपोआपच सूट किंवा सवलत मिळे. आणखी दुसरे अप्रत्यक्ष कर फारसे नसत. एखादा जुलुमी राजा आपल्या चैनीकरितां कदाचित कराच्या नव्या बाबी वाढवीत असे. परंतु हा प्रकार क्वचित ठिकाणीं व कधीं कधींच होत असे. ब्रिटिश अंमलापूर्वीची आणखी एक गोष्ट ध्यानांत ठेवण्यासारखी आहे; ती ही कीं, शेअधोलेखन मजकूरतकरी हे बहुतेक ठिकाणीं शेतीचे मालक व कसणारे असल्यामुळे शेतसारा दिल्यानंतर, शेताचें सर्व उत्पन्न त्यांनाच राही-पुढील काळांत या स्थितीत कां फरक झाला हें पुढें समजेल. पांढरपेशा जातीचे लोक यांना लष्करी, मुलकी व राजदरबारी सर्व प्रकारच्या कारभारांचा अधिकार असे, व म्हणून त्यांना उद्योगाची वाण नसे, यामुळे समाजांतल्या या तिन्ही वर्गाची साधारण ब-या प्रकारची स्थिति होती. तसेंच देशांतला व्यापार सर्व एतद्देशीय लोकांच्या हातांत होता. परदेशचा जो थोडा निर्गत व्यापार होता तेवढा मात्र परकी लोकांच्या हातांत होता. हिंदुस्थानांत कंपनी सरकारचें राज्यस्थापनेचा काळ ह्मणजे एकंदरींत आपसांतील कलहाचा व देशांतील अंदाधुंदीचा काळ होता. यामुळे ही स्थिति संपत्तीच्या वाढीस व लोकांच्या सुखासमाधानास अनुकूल नव्हती. याच काळांत युरोपांतील कलाकौशल्याची व विशेषतः यंत्रकलेची जी प्रगति झाली त्याच्या योगानें हिंदुस्थानांतील कारागीरवर्ग खालावत चालला व त्याची स्थिती सांपत्तिक दृष्ट्या हलाखीची होत चालली हें वर दाखविलें आहे; व शेतक-याची स्थितिही वाईट होण्यास कारणें उपस्थित झालीं तीं अशी. प्रथमतः कंपनीला राज्याधिकार मिळाला तरी सर्व राज्यकारभार नेटिव लोकांमार्फत व पूर्व पद्धतीनेंच चालत असे. परंतु पुढें कंपनी सरकार आपल्या ताब्यांतील मुलुखाचा