पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/500

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 [ ४८४] या सालीं रेल्वेच्या उत्पन्नांत फारच तोटा आल्यामुळे, आयात निर्यात जकाती व मिठावरील कर यांमध्येंही उत्पन्न कमी झाल्यानें एकंदर जमाखर्चात तूट आली आहे. शिवाय या जमाखर्चात सर्व दुबेरजी रकमा गाळून टाकल्यामुळे निरनिराळ्या खात्यांतील जमा मुळींच नाहींत. एका दृष्टीनें त्या बाबी सरकारच्या उत्पन्नाखालीं येतील व त्या सुमारें ३० लाख पौंड असतात असें समजण्यास हरकत नाहीं. तसेंच सरकारी कारखान्यांत व विशेषतः रेल्वेंत तोटा आला नाहीं तर यापासून एकंदर उत्पन्न वीस लाख पौंड येतें. एकदर करांचे सरासरी ४ कोटी ५० लाख पैोंड उत्पन्न येतें. ह्मणजे कर व कारखाने मिळून ठोकूळ मानानें हिंदुस्थान सरकारचें पाच कोटी पौंड निवळ उत्पन्न आहे; त्यांपैकीं २ कोटी रुपये लष्करी खर्चाला जातात; सुमारें ७० लक्ष पौंड कर्जावरील व्याज व करवसुलीकरतां होणारा खर्च याकरितां खर्च होतात व बाकीचे २ कोट ३० लक्ष पौंड एकंदर प्रजेच्या उपयोगाकरितां खर्च होतात. आतां यांपैकी इंग्लंडांत किती खर्च होतो व हिंदुस्थानात किती होतो हेंही पाहाण्यासारखे आहे. एकंदर ५ कोटी पौंडांपैकी १ कोटी विलायतेस तेथल्या खर्चाप्रीत्यर्थ लागतात. यांनाच 'होमचार्जेस ह्मणतात. २ कोटी रुपये लष्करी खर्चाला लागतात व २ कोटी मुलकी खर्चाला लागतात. म्हणजे हिंदुस्थानच्या एकंदर उत्पन्नाचा पांचवा हिस्सा उत्पन्न विलायतेंत खर्च होतें व मागें एका भागांत सांगितल्याप्रमाणे या कारणानेंच हिंदुस्थानचा निर्यात व्यापार आयात व्यापारापेक्षां नेहमीं जास्त असतो. कारण हे १ कोटी पौंड पैशाच्या रूपानें विलायतेंत जात नाहींत तर मालाच्या रूपानें जातात. वरील आंकडे एकंदर हिंदुस्थानच्या जमाखर्चाची ढोबळ कल्पना येण्याकरितां दिलेले आहेत. आतां हेच आंकडे रुपयांमध्यें दिल्यानें निवळ मराठी वाचकांस जास्त चांगली कल्पना येईल. हिंदुस्थानसरकारचें सामान्यतः ७५ कोटी रुपयांचें उत्पन्न आहे. यांपैकीं ३० कोटी रुपये लष्करी खर्च आहे, ३० कोटी रुपये मुलकी खर्च आहे व १५ कोटी रुपये विलायतेंत खर्च होतात. यपैिकीं अफूचें सुमारें ७ कोटी रुपयांचें उत्पन्न हे खरोखरी चिनी लोक देतात, तेव्हां कराचा संपात काढतांना हे उत्पन्न वजा केलें ह्मणजे ६८ कोटी रुपयांचें उत्पन्न हिंदी प्रजेपासून हिंदुस्थानसरकाराला मिळतें व ब्रिटिश हिंदुस्थानची लोकसंख्या २२ कोटींच्यावर आहे. यावरून एकंदर करांचा संपात दर माणशी