पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/462

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ४४६] व विविधता सर राबर्टपील व ग्लॅड्रस्टन या दोन मुत्सद्यांनीं काढून टाकली, व इंग्लंडच्या कराच्या पद्धती सोपें व साधे स्वरुप आणलें. तसेंच देशांतील कराची पद्धती अशी असावी कीं, वेळप्रसंग आल्यास फार खर्च न वाढवितां कराचें उत्पन्न वाढवितां यावें. प्राप्तीवरील कर अशा त-हेचा असतो. तो कर पैोंडाला अमुक पेन्स या दरानें ठरविलेला असतो. आता वेळप्रसंगी हा दर वाढविला म्हणजे झाले.हिंदुस्थानातील मिठावरील कर अशा त-हेचाच आहे. अधिक खर्च न वाढवितां या कराचें उत्पन्न पेनाच्या फटकारयासरसे वाढवितां येतें. शेवटीं कराची एकंदर पद्धति अशी असावी कीं, सरकारच्या वाढत्या गरजांबरहुकूम कराचें उत्पन्न आपोआप वाढतें असावें. अप्रत्यक्ष करा मध्यें हा गुण असतो. लोकांच्या भरभराटीबरोबर या कराचें उत्पन्न आपो आप वाढत जातें व अन्तर्जकातींची वाढ हे . एक देशाच्या भरभराटीचें चिन्ह समजलें जातें. आतां निरानिराळ्या प्रकारच्या करांचा लोकांवर बोजा कशा रीतीनें पडतो हें पहावयाचें राहिलें; करांच्या या संपांत-मीमांसेचा विचार पुढील भागांत करूं.