पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/460

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ છછછે] प्रजाजनास होतो. त्यासंबंधीच्या खर्चाकरितां सररहा कर सरकार घेतें परंतु प्रत्येक मनुष्याला सरकारच्या कर्तव्यकर्मापासून किती लाभ होतो हें मोजणें प्रत्येक करांत मनुष्याचा किती स्वार्थत्याग होतो हें मोजण्याइतकें अवघड आहे, व यामुळे ही मीमांसा सर्वस्वी व्यवहार्य नाहीं.

    याप्रमाणें समतेच्या कसोटीसंबंधाने वरच्या तीन मीमांसा प्रतिपादन करण्यांत आलेल्या आहेत. यांपैकीं अमुकच सर्वस्वी खरी असें ह्मणणें रास्त होणार नाहीं. प्रत्येकीमध्यें थोडा फार सत्याचा अंश आहे. व्यवहार्यतेच्या दृष्टीनें कराची सामर्थ्य-मीमांसा हीच सर्वात चांगली आहे यांत शंका नाहीं. कारण सामर्थ्याची कसोटी पुष्कळ अंशानें दृश्य व सहज लागू करतां येण्यासारखी आहे व यामुळे सुधारलेल्या देशांत या तत्वाचा अवलंब थोडयाफार अंशानें केला जातो.
     कराचें दुसरें तत्त्व-कराची निश्चितता- कर भरण्याची वेळ, कर भरण्याची तऱ्हा, व कराची रक्कम, या सर्व गोष्टी कर भरणारास व दुस-या प्रत्येक माणसास स्पष्टपणें व मुकरपणें ठाऊक पाहिजेत."हें तत्व अगदीं स्पष्ट आहे. याचें रहस्य कराची निश्चितता व त्याची प्रसिद्धता यांमध्यें आहे. 'अमुक कर द्यावयाचा हें कर भरणारास निश्चितपणें ठाऊक असलें ह्मणजे सरकारी अंमलदारांस जुलमजबरदस्ती करण्यास अवसर मिळत नाहीं. या तत्वाप्रमाणें किंमतीवरून ठरविलेल्या जाणा-या आयात जकाती आनिश्चित होतात. आयात व्यापा-याला आपल्याला काय जकात द्यावी लागेल हें माहीत नसतें व यामुळें असा व्यापारी कस्टमखात्याच्या अंमलदाराच्या तावडींत सांपडतो व अशामुळें लाचलुचपत होण्यास कारण होतें. जमीनीवरील दरवर्षी उत्पन्नाच्या मानानें ठरविला जाणारा कर प्रजेला फार त्रासदायक होतो; याचें कारण या तत्वाचें पालन होत नाहीं हें होय. फ्रान्सच्या राजक्रांतीपूर्वीं फ्रान्समध्यें जमीनीवरील हा कर वर्षास बदलणारा आनिश्र्चित कर होता. यामुळे शेतक-यांवर सरकारी अंमलदारांस जुलूम करण्यास फार अवसर मिळे. या कराच्या आनिश्चिततेचा परिणाम संपत्ती उत्पादनावर फार अनिष्ट होतो.

कराचें तिसरें तत्व-कराचा सोईस्करपणा- कर भरण्यास सोईचें होईल अशा वेळीं व अशा रीतीनें कराची वसुली करावी. प्रजेला सोईस्कर हाईल अशा रीतीने कर वसूल करण्याचें