पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भाग दुसरा. ]अर्थशास्त्राची व्याख्या व शास्त्रीय पद्धती एखादे स्थळ किवा प्रदेश पहावयास निघाले असतां ज्याप्रमाणे स्थळाचा किंवा प्रदेशाचा जवळ असला म्हणजे ते स्थळ किंवा

तो

प्रदेश पहाणे सुलभ जाऊन त्रास व वेळ वांचतो; व शिवाय आपल्याला मनोरंजन व ज्ञानप्राप्ती जास्त करून घेतां येते, त्याप्रमाणेच कोणत्याही विषयाच्या अगर शास्त्राच्या अरंभी दिलेल्या त्या विषयाच्या अगर शास्त्राच्या व्याख्येची गोष्ट आहे.त्याचेयोगाने तो विषय किंवा शास्त्र समजण्यास व त्यापासून सत्यज्ञान-ज्ञानाचा आभास नव्हे-होण्यास फार मदत होते. यामुळे सर्व ग्रंथकारांची प्रथमारंभीं हाती घेतलेल्या शास्त्राची व्याख्या देण्याची रीत आहेत्या रीतीस अनुसरून येथेही अर्थशास्त्राची शास्त्रीय व्याख्या देण्याचा विचार आहे.
अतज्ज्ञ अशा सामान्य माणसास अर्थशास्त्र स्हणजे काय असा प्रश्न केल्यास तो म्हणेल , व्यापारउदीम व उद्योगधंद्यांची माहिती देणारा जो विषय अर्थशास्त्र होय. या व्यावहारिक कल्पनेला पारिभाषिक शब्दांचा पोषाख चढवून कांहीं ग्रंथकारांनी हीच अर्थशास्त्राची शास्त्रीय व्याख्या म्हणून मानली ऊदारहणार्थ, मँकलाऊडने आपल्या ग्रंथांत अदलाबदल अगर विनिमय यांची मीमासा किंवा उपपत्ति करणारे शास्त्र त अर्थशास्त्र होय अशी अर्थशास्त्राची व्याख्या केली आहे. या व्याख्येंत व सामान्य माणसाच्या कल्पनेत पारिभाषिक शब्दांखेरीज दुसरा भेद नाहीं हें वाचकांच्या तेव्हांच ध्यानांत येईल. परंतु या व्याख्येनें अर्थशास्त्राचा यथार्थ बोध होत नाही. शिवाय या व्याख्येवर अव्याप्तीचा दोष येतो. अर्थात् ही व्याख्या फार संकु चित आहे. व्याख्येत अर्थशास्त्रांत वास्तविकपणें अंतर्भूत होणाऱ्या सर्व
विषयांचा समावेश होत नाही.कारण,व्यापार विनिमय यांची मीमांसा हा अर्थशास्त्राचा एक भाग अगर अंग आहे. परंतु अर्थशास्त्राचीं