पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/416

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ છ૦૨ ] पुष्कळ मागणीनें विनिमयपत्रावर वर्तावळा द्यावा लागतो व जोंपर्यंत हा वर्तावळा रोख पैसे पाठविण्याच्या खर्चापेक्षां कमी आहे तोंपर्यंत आयात व्यापारी वर्तावळा देतील. परंतु विनिमयपत्राचा वर्तावळा जर या पैसे पाठविण्याच्या खर्चाच्या वर जाऊं लागला तर ते व्यापारी परकी देशांत रोख प्रेस पाठवितील. तेव्हां विनिमयपत्राच्या वर्तावळ्याची शिकस्त मर्यादा रोख पैसे पाठविण्याच्या खर्चाइतकी असते. याला निष्कधातुमर्यादा ह्मणतात. आतां अशी कल्पना करा कीं, एका देशांतील माल दुस-या देशांत पुष्कळ गेला म्हणजे आतां देशांत पैसे यावयाचे आहेत. अशा वेळीं निर्यात व्यापाऱ्यांच्या विनिमयपत्राचा पुरवठा मागणीपेक्षां जास्त होईल. म्हणजे निर्यात व्यापा-यांमध्यें विनिमयपत्रे विकण्याकरितां चढाओढ सुरू होईल व यामुळे विनिमयपत्राची किंमत कमी होईल ह्मणजे या पत्रांवर निर्यात व्यापा-यांना कसर खावी लागेल. अर्थात् विनिमयपत्रांतील रकमेपेक्षां कमी रोखपैसे घ्यावे लागतील. मागें सांगितल्याप्रमाणें या कसरीचा भावही निष्कधातुमर्यादेिच्या खालीं जाणें शक्य नाहीं. कारण रोख पैसे आणविण्याच्या खर्चापेक्षां विनिमयपत्राबद्दल जास्त कसर खावी लागली तर निर्यात व्यापारी परकी देशांतून पैसे रोख आणविण्याची तजवीज करतील. येथपर्यंत ज्या देशाची चलनपद्धति एकच आहे अशा देशाचा बहिर्व्यापार विनिमयपत्रांनीं कसा चालतो व त्यायोगें व्यापाराची सोय कशी होते हैं पाहिलें. परंतु प्रत्येक देशाची चलनपद्धति स्वतंत्र असते. शिवाय सोन्याचेंच कायदेशीर चलन असणारे व रुप्याचेंच कायदेशीर चलन असणारे असे जगांतील देशाचे दोन भेद आहेत. हल्लीं खरी द्विचलनपद्धति कोठेंच नाहीं हें मागें सांगितलें आहे. तेव्हां ज्यांचें चलन सोन्याचें आहे अशा परंतु ज्यांचें नाणें निरनिराळें आहे अशा देशामध्यें देवघेव विनिमयपत्रांनीं कशी चालते हैं पाहिलें पाहिजे. या देवघेवींतच हुंडणावळीचा प्रश्न येतो. इंग्लंडचें कायदेशीर चलन पैौंड हें आहे तर फ्रान्सचें कायदेशीर चलन फ्रँक हें आहे, या कायदेशीर चलनामध्यें शुद्ध सोनें किती असावयाचें हें त्या त्या देशाच्या टांकसाळीच्या कायद्यानें ठरलेलें आहे. इंग्रजी पौंडांत टांकसाळीच्या कायद्याप्रमाणें ११३ ग्रेन अगर ७-३२ ग्राम शुद्ध सोने असत व तितकेंच शुद्ध सोने फ्रान्सच्या कायद्याप्रमाणें २५.२२ फ्रँक-