पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/374

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[३६२] वरील कोष्टकांत निर्दिष्ट केलेल्या पेशांपैकीं धात्वात्मकपैशाचें वर्णनपूर्वीच आलेलें आहे. अधात्वात्मक पैशाचे कायदेशीर व व्यावहारिक असे दोन भेद होतात. या दोन भेदांच्या मुळाशीं पत, साक अगर विश्वास हा ही पत सरकारची असली व तिचा उपयोग सरकारनें कायदा करून केला ह्मणजे कायदेशीर कागदी पैसा देशांत प्रचलित होतो. ही पत खासगी व्यक्तीची असून कायद्याच्या साहाय्याशिवाय त्यांच्या हातच्या वचनाच्या कागदाचा विनिमयांत उपयोग होऊं लागला ह्मणजे व्यावहारिक कागदी पैसा देशांत प्रचलित होतो. यापैशाचे तीन प्रकार आहेत व त्यांपैकी चेक व हुंड्या यांचें वर्णन 'पेढी' या नांवाच्या पुढील भागांत येईल व विनिमयपत्राचें वर्णन परदेशच्या व्यापाराच्या मीमांसेनंतर येईल. या भागांत फक्त कायदेशीर कागदीचलनाचाच विचार करावयाचा आहे; परंतु या दोन्ही प्रकारच्या कागदी चलनांच्या मुळाशीं असलेल्या पतीच्या स्वरूपाचा आधीं थोडक्यांत विचार केला पाहिजे. अर्थशास्त्रांत पतीच्या स्वरूपाबद्दल फार वाद आहे; परंतु या वादामध्यें ह्मणन्यासारखा त्थ्यांश नाही. पतीचें स्वरूप थोड्या विचारांती सहज ध्यानात येण्यासारखे आहे. व्यापाऱ्याची पत ह्मणजे त्याच्या संपत्तीमुळे प्राप्त झालेली ऋयणशक्ति होय. एखादा बाहेरगांवचा ठासर व्यापारीं मुंबईस जाऊन जवळ एक पैसासुद्धां नसतांना हजारो रुपयांचा माल प्रत्यक्ष खरेदी करून येऊं शकतो. ही खरेदी करण्याची शक्ति म्हणजे त्याची पत होय. त्या व्यापाऱ्याचा मोठा धंदा आहे; त्याची हजारो रुपयांची मालमत्ता आहे; त्याची बाहेरगावी पुष्कळ ठिकाणीं दुकानें आहेत; हे मुंबईच्या व्यापा-यांना ठाऊक असतें; शिवाय तो सच्चा माणस अहि हेही ठाऊक असतें. यामुळे त्याच्या पुढे फेड करण्याच्या वचनावर लोकाचा विश्वास बसतो व म्हणून व्यापारी लोक अशा माणसाला माल विकतात व त्याच्यावर विनिमयपत्रे काढतात. ही विनिमयपत्रे ह्मणजे कांहीं काळानंतर पैसे देण्याचें वचन होय.तेव्हां पतीच्या बुडाशी संपत्तीमत्ता व एकमेकावरील विश्वास या दोन गोष्टी असतात असे ह्मणण्यास हरकत नाहीं.ज्याच्याजवळ कांहीं एक संपत्ति नाही व त्यामुळे जो आपले वचन पाळू शकेल अशी खातरी नसते अशा माणसाला पत मुळीच नसते. तेव्हां पत ही पूर्वीच्या संपत्तीच्या जोरावर मिळविण्याची शक्ति अथवा ऋयणशक्ति होय. आतां या शक्तीचा