पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/372

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[३६०] एकंदर पैशाची ऋयणशक्ति कमी होत आहे. अर्थातूं पदार्थाच्या किंमती वाढण्याकडे कल आहे. समुद्राच्या लाटांप्रमाणें या किंमती कांहीं वर्षामागे जास्त आहेत, तर कांहीं वर्षे पाठीमागे जात आहे असें दिसेल. तरी एकंदर शतकोशतकांच्या काळाकडे नजर दिली असतां पदार्थाच्या किंमतींचें सरसकट मान सारखे पुढे पुढेंच जात आहे, असें दिसून येईल व याचें कारण देशांच्या आधिभौतिक सुधारणेबरोबर धात्वात्मक पैशाखेरीज अधात्वात्मक पैशाचे पुष्कळ प्रकार उद्भूत होतात हें होय. हे प्रकार कोणते व त्यांचे स्वरूप काय यांचा विचार पुढील भागांत करावयाचा आहे. तेव्हां हा विषय येथेंच थांबविणें बरें

                   भाग अकरावा 
            अधात्वात्मक पैसा व त्याचे प्रकार.
येथपर्यंत धात्वात्मक पैशाचा विचार झाला; परंतु औयोगिक बाबतीत पुढारलेल्या देशांत यापुढेंही मजल जाते. ज्याप्रमाणें ऐनजिनसीव्यवहाराच्या पुढची पायरी निष्कव्यवहाराची आहे त्याचप्रमाणें निष्कव्यवहारपुढची पायरी पतीच्या व्यवहाराची अगर विश्वासव्यवहाराची होय .व वरवर पहाताना विश्वास्व्यवहार हा ऐनजिनसी व्यवहारासारखा दिसतो .अर्वाचीन काळच्या व्यापाराच्या घडामोडी धातूंच्या पैशाखेरीज होतात .यामुळे त्या ऐनजिनसी व्यवहाराप्रमाणे दिसतात खऱ्या;परंतु वास्तविक त्यामंध्ये कागदी पैसा हा विनिमयसामान्य बनतो .तेव्हां आतां कागदी पैसा ,त्यांचे स्वरूप व त्यांचे प्रकार व त्यांच्या चलनपद्धतीच्या तत्वें यांचा य भागांत विचार करावयाचा आहे.
          ज्या कारणांनी समाजांतील  बाल्यावस्येंतील पैशाचीं द्रव्यें मागे पडून सोन्या-रुप्याचा सर्वत्र प्रसार होतो त्याच कारणांनीं कागदी चलनाचाही