पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/369

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


[ ३५७]

पडतील व विनिमय पूर्ण होईल; परंतु येथें प्रत्येक पदार्थाची किंमत शंभर रुपये झाली. पूर्वीच्या व्यवहारांत मालाची किंमत १० रुपयेच होती; तेव्हां हा फरक कसा झाला. त्याचें उत्तर असें आहे कीं, पहिल्या व्यवहारांत पैशाच्या १०० नाण्यांचा एकदांच उपयोग झाला; परंतु दुस-या व्यवहारांत एक एका नाण्याचा दहा दहा वेळां उपयोग झाला होता. याला अर्थशास्त्रांत पैशाचा चलनवेग ह्मणतात. वरील उदाहरणावरून पदार्थाच्या किंमतींसंबंधानें खालील तत्व सिद्ध होतें. "कांहीं एक व्यवहार करण्यांत पैशाच्या एका नाण्याचा दहा वेळां उपयोग करणें काय किंवा दहा नाण्यांचा एकदां उपयोग करणें काय-या दोहोंचा परिणाम पदार्थाच्या किंमतींवर सारखाच होतो."

वरील विवेचनावरून पैशाची संख्या व त्याचा चलनवेग या दोन कारणांवर पदार्थांच्या किंमतींचें सरसकट मान अवलंबून असतें असें दिसून येईल. याचें प्रत्यंतर इतिहासावरून हवें तितकें मिळतें. युरोपमध्यें मध्ययुग व अर्वाचीन युग यांच्या संक्रमणावस्थेमध्यें पदार्थाच्या किंमतींच्या सरसकटमानांत जी क्रांति झाली ती पैशाच्या संख्येच्या वाढीमुळें होय यांत शंका नाहीं. तसेंच हिंदुस्थानांत ब्रिटिश अंमलापूर्वीच्या काळच्या किंमतीच्या सरसकटमानांत व ब्रिटिश अमलाच्या पूर्ण स्थापनेनंतरच्या काळाच्या किंमतीच्या मानांत जमीनअस्मानचें अंतर पडले आहे तेंही पैशाच्या संख्येच्या वाढीचा परिणाम आहे हें निर्विवाद आहे. गेल्या पांचचार वर्षांतही पदार्थांच्या किंमतींच्या मानांत जी वरकमान होत आहे त्याचें कारणही या गेल्या पांच वर्षांत पाडलेल्या नाण्यांच्या संख्येच्या विलक्षण वाढींत आहे यांत शंका नाहीं.

तेव्हां पैशाच्या मोलाच्या संख्यात्मक मीमांसेंत सत्यांश आहे यांत शंका नाहीं. परंतु अभिमतअर्थशास्त्रज्ञांच्या या मीमांसेंत त्यांच्या 'मजुरीफंडा ’च्या मीमांसेंतल्यां सारखाच दोष घडलेला आहे. ज्याप्रमाणें देशांतील चलभांडवल व लोकसंख्या यांवर मजुरी अवलंबू असते हें खोंटें नाही; परंतु मजुरीच्या दराचीं एवढी दोनच कारणें नाहींत; तर आणखी कारणें आहेत; त्याचप्रमाणें पदार्थाच्या सरसकट किंमतींचें मान किंवा पैशाची क्रयणशक्ति ही पैशाची संख्या व चलनवेग या दोन कारणांवर अवलंबून आहे हें खोटें नाहीं. तरी पण एवढींच या क्रयणशक्तीचीं कारणें