पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/353

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जागा रहात नाहीं. ज्याप्रमाणें जड सृष्टीला गुंरुंत्वाकर्षणाचा नियम लागू आहे त्याचप्रमाणें तो मानसिक व व्यावहारिक सृष्टीलाही लागू आहे. एकदां आकास्मिक कारणानें कां हाईना, परंतु बरेचसे परिमाणू एकेजागीं आले कीं, गुरुत्वाकर्षणानें बाकीचे परिमाणू त्या ठिकाणीं गोळा होतात व पूर्वी जेथें कांहीं नव्हतें तेथें एक जड पदार्थ तयार होतो व त्याला कायमपणा येतो. तीच स्थिति व्यावहारिक गोष्टींत होते. सुधारलेल्या जगांत एक चलनाकडे प्रवृति कां व कशी झाली, हें खालील युरोपच्या पैशाच्या संक्षिप्त इतिहासावरून दिसून येईल.

   युरोपमध्यें मध्ययुगाच्या प्रथमपादांत तांबे व चांदी यांचींच बहुशः नाणीं होतीं. अमेरिकेच्या शोधानंतर युरोपमध्यें सोन्याचीं नाणीं प्रचारांत येऊं लागलीं. १४ व १५ व्या शतकांत सोन्यारुप्याची फारशी पैदास झाली नाहीं व व्यापाराच्या वाढीमुळें पेशाची किंमत वाढली व पदार्थाच्या किंमती कमी झाल्या. या काळांत चांदीची फारशी पैदास झाली नाहीं. यामुळे सोन्यारुण्याच्या भावांत फरक झाला. १२ ते १ पासून ९ ते १ वर भाव आला. परंतु दोन तीन शतकें सामान्यतः १० ते १ च्या सुमारास हा भाव आंदोलत होता. या सर्व काळांत व पुढेंही १८१६ पर्यंत प्रत्यक्ष व्यवहारांत युरोपच्या सर्व देशांत द्विचलनपद्धतीच चालू होती असें ह्मणण्यास हरकत नाहीं. परंतु ती आपोआप व न कळत उत्पन्न झालेली होती. ती सर्वांच्या संगनमताची व व्यवस्थित स्वरुपाची व मुद्दाम घडवून आणलेली नव्हती व म्हणून त्यापासून कांहीं कांहीं तोटे होत. प्रत्येक देश सोन्यारुप्याचा भाव आपापल्याच मतानें ठरवी. यामुळें फ्रान्समध्यें एक भाव, तर इंग्लंडमध्यें दुसराच भाव असा प्रकार होई. या अव्यवस्थितपणामुळें दोन धातूंच्या नाण्यांमध्यें फरक पडे. कारण ग्रेशॅमच्या सिद्धांताची अम्मलबजावणी सुरू होई. परंतु १६ व्या शतकांत अमेरिकेंतील चांदीच्या खाणी सांपडल्या व त्यानें युरोपांत किंमतींत विलक्षण क्रांति होऊं लागली व ही क्रांति १६६० मध्यें पुरी झाली व तेव्हां सोन्यारुप्याचा भाव १ ते १५ या प्रमाणावर आला व तेव्हांपासून बहुतेक १९ व्या शतकापर्यंत साधारणतः हा भाव बराच स्थिर राहिला. या काळांत सोन्यारुप्याच्या पैदाशींत किती वेळीं तरी कमिजास्तपणा झाला, तरी सोन्यारुप्याच्या भावाच्या प्रमाणांत ह्मणण्यासारखा फरक झाला नाहीं. याचें श्रेय द्विचलनपद्धतीला