पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/352

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ३४० नाहीं. तसेंच कोणत्याही देशाच्या प्रत्यक्ष व्यवहारांतील चलनांत फरक होण्याचें कारण नाहीं. इंग्लंडचे पैोंड राहतील; जर्मनीचा मार्क राहील, फ्रान्सचा फ्रँक राहील; अमेरिकेचा डॅलर राहील; देशाच्या अन्तर्व्यवस्थेंत कांहीं एक फरक करण्याचें कारण नाही; टांकसाळीचा अधिकार् ज्याचा त्या देशाचा राहील. द्विचलनाच्या अन्तराष्ट्रीय प्रचारास फक्त दोन गोष्टी पाहिजेत. त्या सर्व राष्ट्रांनीं मिळून सोन्या-रुप्यामधील भाव संगनमतानें ठरवावयाचा व टांकसाळी दोन्ही धातुंच्या नाण्यांना खुल्या ठेवून दोन्ही धातूंचीं नाणीं अमर्याद कायदेशीर फेडीचीं चलनें बनवावयाचीं. यामुळें इंग्लंडमध्यें शिलिंगाऐवजी ठरलेल्या भावाच्या प्रमाणानें पूर्ण वजनाचीं शिलिंगाचीं नाणीं पाडून तीं पूर्ण कायदेशीर फेडीचें चलन करावीं लागतील. ह्मणजे त्याचें उपपैशाचें रूप काढून त्याला पैशाचें रूप यावें लागेल. ब्राकीच्या देशांमध्यें कोणताच विशेष फरक करण्याचें कारण नाहीं. वर दिलेल्या गोष्टी संगनमतानें एकसमयावच्छेर्देकरून १८७३ मध्यें किंवा त्या सुमारास सर्व राष्ट्रांनीं जर केल्या असत्या तर सर्व जगांत अन्तर्राष्ट्रीय चलन-पद्धति सहज अंमलांत आली असती व द्विचलनवाद हा तात्विक वाद राहिला नसता. परंतु आतां द्विचलनपद्धति निव्वळ अर्थशास्त्राच्या ग्रंथांतच राहणार यांत शंका नाहीं. कारण जगाच्या प्रत्यक्ष व्यवहारांत ती आतां शक्य कोटीच्या पलीकडे गेलेली आहे. ज्याप्रमाणें निरनिराळे ग्रह एकत्र यण्याचा येाग फार क्वचित येतो व तो एकदां निघून गेला म्हणजे परत येत नाहीं, त्याप्रमाणे एका काळीं द्विचलन्पद्धतीचा योग होता. परंतु आतां तो नाहींसा झाला आहे व पुनः योग येण्याचा संभव दिसत नाहीं.

   आता असा प्रश्न निघतो की,जर शास्त्रीय दृष्टीनें द्विचलन-पद्धति ही दोषराहित पद्धति आहे व ती सर्वस्वी फायदेशीर आहे तर मग हल्लींच्या सुधारलेल्या सर्व राष्ट्रांचा एक चलनाकडे कल कां दिसून येतो व बहुतेक सर्व देशांनीं भराभर कोणत्याना कोणत्यां रूपानें एकचलनपद्धति का स्वीकारली ? या प्रक्षाचें उत्तर असें आहे कीं, जगांत आकस्मिकपणा हिणून एक असतो व केव्हां केव्हां दोन गेोष्टींपैकी कमी फाययाची गोष्ट प्रथमतः अस्तित्वांत येते; व जरी ती आकस्मिकपणें घडलेली असली तरी तिचें अस्तित्व अनुकूल परिस्थितीमुळें कायमचें होतें व दुस-या गोष्टीला