पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/342

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ३३० ] रुष्याचें नाणें आहे. ८७'२७ ग्रेन अगर ७॥| आणे भार इतकें एका शिलिंमाचे वजन असलें पाहिजे व त्यांत ८०.७२७ ग्रेन अगर ७‌ १\३ आणे भ्रार शुद्ध चांदी असली पाहिजे. शिलिंग हें ४० शिलिंगपर्यंत एका फेर्डीत कायदेशीर चलन आहे. पेन्स,हाफ्पेन्स व फार्दिग हीं नाणीं ब्रांझ धातूचीं अहेत.ब्रांझ ही मिश्र धातु आहे व ती ९५ भाग तांवें ४ भाग कथील व एक भाग जस्त मिळून करतात. यांपैकीं पेन्स व हाफ्पेन्स एका शिलिंगापर्यंत कायदेशीर चलन आहे. फार्दिग तर ६ पेन्सांपर्यंतच कायदेशीर चलन आहे. अशा प्रकारची इंग्लंडांतील संमिश्र चलनपद्धति आहे. अर्वाचीन काळीं टांकसाळी खासगी लोकांच्या हातांत नसतात; तसेंच सरकारची सचोटीही हल्लीं वाढलेली आहे. यामुळे टांकसाळीचें काम अगर्दी काययाबाहुकूम चालतें व नाणीं पाडग्याच्या बाबतींत पूर्वसारखी लबाडी होत नाही. मागें सांगितलेंच आहे कीं, पूर्वकाळीं अनियंत्रित सत्ताधारी राजे आपल्याला पैशाची अडचण आली ह्राणजे नाणें पाडण्याच्या आपल्या हृकाचा दुरुपयोग करून नाणीं जास्त हीणकस करीत व यामुळे देशामध्यें एकाच काळीं कायदेशीर वज* नाचीं व कसाचीं नाणीं व कमी वजनाचीं व हीणकस नाणीं केव्हां केव्हां एकसमयावच्छेद्वेकरून चालत असत. तसेंच पूर्वकाळीं परंदेशांतलीं नाणीं सुद्धां स्वदेशांतल्या नाण्याबरोबर चालत असत. अशा नाण्यांच्या घोटाळ्यामुळे पूर्वकाळीं नाणीं पारखण्याचें काम महत्वाचें असे. तें काम पेढीवाले व सराफ करीत. अर्वाचीन काळीं या बाबतीत पुष्कळ सुधारणा झालेली आहे. बहुतेक सर्व देशांतील चलनपद्धतीला बरेच व्यवास्थित स्वरूप आलेलें आहे. तरी पण पैशाची स्वाभाविक झीज राहणारच व म्हणून प्रत्येक औद्योगिक बाबतीत पुढारलेल्या देशामध्यें पूर्ण वजनाचीं नाणीं व हलकीं नाणीं नेहर्मी दृष्टीस पडतात. परंतु पूर्ण-वजनी व हलकीं नाणीं देशांत एकदम चालू असलीं ह्राणजे त्यासंबंधों एक नियम दिसून येतो. तो नियम प्रथमतः ग्रेशँम या गृहस्थाच्या ध्यानांत आला ह्राणून तो अर्थशास्त्रामध्यें ग्रेशँमचा नियम या नांवानें प्रसिद्ध आहे. ग्रेशँमचा सिद्धांत एका वाक्यात सांगतां येण्यासारखा आहे. “ खेोटा पैसा खऱ्या पैशास बाहेर घालवितो.” वर सांगितलेंच आहे कीं,प्रत्येक देशामध्यें झिज