पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/322

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 [ ३१० ] त्या पदार्थाची होते. समजा, रविवर्म्याच्या प्रसिद्ध चित्रांपैकीं शकुंतलेच्या जन्माची मूळ तसबीर-रविवर्म्याच्या हातची-बाजारांत विकावयास आली आहे. ही तसबीर कोणास नको आहे ? याची किंमत थोडी आहे असें कळल्यास तेथें पुष्कळ लोक जमतील. परंतु तसबीर एकच आहे, त्या अर्थीं ती कोणाला तरी एकालाच मिळणार व असें होण्याकरितां या वेवाऱ्यांमध्यें चढाओढ सुरू होईल व किंमतीचे लिलांव सुरू होतील. एक मनुष्य किंमत जास्त करील, परंतु मागील भागांत सांगितल्याप्रमाणें किंमत वाढली म्हणजे थोडी मागणी कमी होते. असें होतां होतां दोन मागणीदारं राहतील तरी सुद्धां या दोघांमध्यें चढाओढ सुरू होईल व शेवटीं पुरुषोत्तम मावजीसारखा पुराणवस्तुसंग्रहेच्छु गृहस्थ त्याची आणखीही किंमत वाढवील व दुसऱ्या माणसाला इतकी किंमत वाढविणें शक्य नसेल किंवा त्याला त्या चित्राची इतकी अभिरुचि नसेल म्हणून तो यापुढें किंमतच वाढविणार नाहीं व म्हणून अशी तसबीर पुरुषोत्तम मावजीसारख्या लक्ष्मीपुत्राच्या हातीं पडेल. आतां अशा वस्तूंबद्दल देशांत मागणी उत्पन्न होणें हें हजारों गोष्टींवर अवलंबून आहे. या वर्गांतील संपत्तीच्या वस्तूंनीं भागविली जाणारी वासना ही अगदीं कृत्रिम वासना आहे व ती देशांतील सुधारणेचा परिणाम होय.

 वरील विवेचनावरून असें दिसून येईल कीं, संपत्तीच्या या पहिल्या वर्गामध्यें मूळकिंमत व बाजारकिंमत यांमध्यें भेद नांहीं. परंतु पुढील संपतीच्या दोन वर्गांमध्यें मूळकिंमत व बाजारकिंमत यांमध्यें मोठा भेद आहे व ही मूळकिंमत कशावर अवलंबून आहे हें आतां पहावयाचें आहे.             
 मालाची मूळकिंमत ही माल उत्पादन करण्यास लागणा-या खर्चावर अवलंबून असते. तेव्हां या खर्चामध्यें कशा कशाचा अन्तर्भाव होतो हें प्रथमतः पाहिलें पाहिजे. संपत्तीच्या उत्पादनास चार कारणें लागतात असें या ग्रंथाच्या दुसऱ्या पुस्तकांत दाखविलें आहे. तेव्हां संपत्ति-उत्पादनाच्या या साधनांचा मोबदला संपत्तीच्या किंमतीमधून आला पाहिजे हें उघड आहे. संपत्ति उत्पन्न करण्यास समाजाच्या बाल्यावस्थेंत श्रमच मुख्यतः कारणीभूत होतात व जें थोडें भांडवल लागतें ते श्रमाचाच परिणाम होय. तेव्हां भांडवल ह्मणजे सांठवलेले श्रम होय. सृष्टिशक्ति तर मोफतच मिळते. तेव्हां अशा स्थितीत पदार्थांची मूळकिंमत श्रमाच्या परिणामावर