पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/304

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ २९२ ] श्यक–वस्तू बहुमोलाच्या असे समजले जात नाही. उलट सोने, रुपें, हिरे, मोती वगैरे वस्तू हवा, पाणी, अन्न इत्यादि वस्तूइतक्या उपयोगी नाहींत. त्या जवळ असल्या तरी त्यांनीं मनुष्याची तहानभूक हरावयाची नाही; व या हजारों रुपयांच्या वस्तू जवळ असतांना इतर अवश्यक वस्तूंच्या अभावी मनुष्याला मरणाची पाळी येईल. ज्याप्रमाणे मिडस राजाला वनदेवतेकडून ‘ हात लाविला की सोने’ असा वर मिळून श्रीमंती आल्यामुळे मरणाची पाळी येऊन ठेपली व मिडस राजाला ‘ ही श्रीमंती नकोः असें काकुळतीने म्हणून वनदेवतेला वर मागे घेण्याबद्दल विनंति करण्याची पाळी आली त्याप्रमाणे या सोन्यामोत्यादि संपत्तीचा प्रकार आहे. म्हणजे त्या वस्तू मनुष्याला कमी उपयोगी आहेत. तेव्हां या वादाप्रमाणे या वस्तूचें मोल कमी असावे. परंतु व्यवहारांत याच्या अगदी उलट स्थितिं आहे. या वस्तू अत्यंत मोलवान समजल्या जातात. वरील अपवादावरून मोलासंबंधी उपयुक्तता-मीमांसा खरी नाहीं असें ठरू लागले. या आक्षेपाच्या अनुसंधानाने मोलाची दुसरी एक मीमांसा कांहीं ग्रंथकारांनी केली तिला . व्ययमीमांसा म्हणतात. या मीमांसेप्रमाणे वस्तूला मोल असण्याचे कारण ती वस्तु निर्माण करण्यास खर्च लागतो हें होय. म्हणजे वस्तूचे मोल हें वस्तूच्या उत्पत्तीच्या खर्चावर अवलं बून आहे असे होते. अर्थात् वस्तू उत्पन्न करण्यास जितका जितका खर्च जास्त तितकी तितकी वस्तूची किंमत जास्त असा या मीमांसेपासून सिद्धांत निघतोः परंतु हा सिद्धांतही पहिल्याप्रमाणे वस्तुस्थितीला धरून नाही असें दृष्टोत्पत्तीस येतें उदाहरणार्थ, एखाद्या विक्षिप्त माणसाने हजारों रुपये खर्च करून एखाद्या निर्जन रानांत मोठा बंगळ बांधला तर या खर्चामुळे तो मोलवान् होणार नाही. त्या बंगल्याची कोणालाही गरज नसल्यामुळे तो कुचकामाचा होईल व त्याला मोल काहीएक येणार नाही. तेव्हां निव्वळ एखाया वस्तूवर पुष्कळ खर्च झाला आहे म्हणून त्याचे मोल वाढेल असे नाही. मोलाच्या कारणाच्या वर निर्दिष्ट केलेल्या दोन मीमांसा व त्यांचे कैवारी यांतील विरोधढालीच्या रंगाबद्दल भांडणाऱ्या शिलेदारांच्या विरोधा प्रमाणे आहे. ढाल पांढरी आहे किंवा काळी आहे याबद्दल शिलेदारां- मध्ये वाद चालला होता. एक म्हणे ती पांढरी आहे, तर दुसरा म्हणे --: