पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/299

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ૨૮૭ ठिकाणीं ' संरक्षण विरुद्ध अप्रतिबंध व्यापार ' या वादग्रस्त विषयाचा ऊहापोह करणें इष्ट असतें. पुढें सोन्यारुप्याच्या खाणींचा शोध व त्यांचा देशांतील व्यापारावर व संपत्तीवर घडलेला परिणाम या प्रश्राचा विचार करणें हें ऋमप्राप्त आहे व शेवटीं हिंदुस्थानांतील नाण्यांची पुद्धति, त्यांचा इतिहास, त्यांचे औघोगिक स्थितीवर झालेले परिणाम वगैरे व्यावहारिक व सध्यां ज्यांच्याबद्दल समाजांत चर्चा चालू आहे अशा प्रश्राचा ऊहापोह करणें इष्ट होईल. वरील विवेचनावरून या पुस्तकांतील प्रतिपाघ विषयांचें महत्व, त्यांचें काठिण्य व त्यांचें जिज्ञासावर्धकत्व व म्हणून एका दृष्टीनें त्याचें मनोरंजकत्व हें वाचकांच्या ध्यानांत आल्यावांचून राहणार नाही असें वाटतें. व या विषयाचें विवेचन वर दिलेल्या ऋमानें या पुस्तकाच्या पुढील भागांत करावयाचें आहे तिकडे आतां वळूं. भाग दुसरा. मोल व किंमत. अदलाबदलीच्या किंवा विनिमयाच्या मुळाशीं असलेली कल्पना ह्राणजे मोलाची होय. साधारण व्यवहारांत मोल व किंमत हे शब्द समानार्थानें वापरले जातात. ' या वस्तूची किंमत काय किंवा तिचें मेोल किती ' असा आपण प्रश्न करतों. ' मोलें घातलें रडाया नाहीं असूं आणि माया ' या कवितेंतही पैसे देऊन किंवा मजुरी देऊन रडावयास सांगण्याच्या रीतीचा उल्लेख आहे. ती वस्तु ' कवडीमोल ' आहे या वाक्यांतही मोल हा शब्द किंमत या अर्थीच योजलेला आहे. कवडया हा आपल्या कित्येक प्रांतांत नाण्याचा प्रकार आहे हें नव्यानें सांगण्याची जरूरी नाहीं. ज्या वस्तूची किंमत कवडीइतकीही नाहीं तिला आपण कवईीमोल वस्तु ह्राणतों. त्याचप्रमाणें तो जिन्नस बहुमोल आहे असें ह्राटलें ह्राणजे त्या वस्तूला पुष्कळ किंमत पडते असें आपण समजतों.