पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/246

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[२३६]

नव्हती. तेव्हां अशा लोकांना आपला धंदा सुधारण्याकरितां भांडवल कोठून आणावयाचें हा जर्मनीमध्यें मोठा प्रश्न होता. व तो प्रश्न या सहकारी पतपेढ्यांनीं सोडविला. तेव्हां आतां या पेढ्यांचे तत्व काय हें प्रथमतः पाहूं.
 या पेढ्यांची पद्धति शोधून काढण्याचा मान ज्या दोघां जर्मन गृहस्थांना दिला पाहिजे त्यांचीं नांवे रफेसिन व स्काट्सडेलीच हीं होत. दोघेही कांहीं काळपर्यंत जर्मन सरकारचे नोकर होते. दोघांनाही शेतकऱ्यांची व कामदारांची दैन्यावस्था प्रत्यक्ष अवलोकनानें कळलेली होती. दोघांनाही या गरीब लोकांबद्वल अत्यंत दया येत असे व दोघांनींही शेतक-यांची व कामक-यांची हो दैन्यावस्था घालाविण्याकरितां सर्व आयुष्यभर श्रम केले व त्यांच्या श्रमाचें फळ म्हणजे सहकारी पतपेढ्या होत. या पेढ्यांचे दोन वर्ग आहेत व हे दोन वर्ग या दोघां गृहस्थांनी निरनिराळे शोधून काढले व अस्तित्वांत आणले असें ह्मटलें तरी चालेल. दोन्ही प्रकारच्या पेढ्यांची एकंदर सामान्य व्यवस्था सारखीच असे. मात्र एका यें सभासदांवर पेढ्यांची अमर्यादित जबाबदारी असते; परंतु भांडवलाचे भाग नसतात; दुसऱ्यांत भांडवलाचे भाग असतात; परंतु त्यांच्यावरील जबाबदारी मर्यादित असते.
 जर्मनीमध्यें १८४८ च्या सुमारास महर्घता झाली होती. त्यामध्यें तर शेतकऱ्यांची दैन्यावस्था फारच झाली. त्यानंतर रफेसिननें आपली सरकारी नोकरी सोडून १८४९ मध्यें त्यानें पहिली पेढी काढली व तेव्हांपासून मरेपर्यंत ह्मणजे सुमारें चाळीस वर्षें त्यानें आपलें सर्व सामर्थ्य सहकारी पतपेढ्या काढण्यांत व त्यांच्या तत्वाचा लोकांमध्यें प्रसार करण्यांत व त्यांचे फायदे लोकांच्या मनांत भरविण्यांत खर्च केलें. स्काट्सडेलीचनेंही तोच क्रम आरंभिला.एकानें खेडेगांवांतील शेतकऱ्यांकडे विशेष लक्ष देऊन त्यांच्यामध्यें अशा पेढ्या काढण्याचा उपक्रम केला.म्हणून लौकिकदृष्ट्या खेड्यांतील व शहरांतील पेढ्या असे दोन वर्ग करतात. परंतु खरोखर यांमधील सामान्य तत्व एकच असल्यामुळें आपण येथें त्या दोहोंचे एकत्रच परंतु विस्तरः विवेचन करूं.
 सहकारी पतपेढ्यांमधील कोणतें तत्व नवीन असून त्याचा इतका