पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/223

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[२१३]

 संप म्हणजे एकमतानें एकसमंयावच्छेदकेंरून किंवा आपला करार संपेल त्या त्या वेळीं एका धंद्यांतील, एका कारखान्यांतील किंवा एका मालकाच्या येथें नोकरी करणा-या मजुरांनीं काम बंद पाडणें होय. अशा त-हेनें एकदम काम बंद पाडण्याचा हेतु हा कीं, कारखानदारांला आपल्या अटी कबूल करावयास लावावयाचें. तेव्हां संपाच्या मूळाशीं कारखानदार व मजूर यांच्यामधला बेबनांव अगर तंटा असतो हें उघड आहे. धंदा किंवा व्यापार मोठ्या भरभराटींत असला म्हणजे कारखानदारांना नफा पुष्कळ होत असतो. त्या वेळीं मजुरीही वाढण्याचा संभव असतो. परंतु कारखानदारांच्या अल्प संख्येमुळें त्यांचें संगनमत ताबडतोब होतें व ते मजुरीचा दर तोच ठेवतात किंवा अल्पप्रमाणानें वाढवितात. परंतु मजुरांना ही वाढ पसंत नसते. आतां मजुरांचें गा-हाणें कारखानदारानें सामोपचारानें ऐकिलें नाहीं म्हणजे मजूर संपाचा निश्चय करतात; परंतु संप पुष्कळ वेळां मजुरी कमी होऊं नये अशाकरितां केले जातात. एखाद्या धंद्याला मंदी आली असतां कारखानदार मजुरीचे दर कमी करण्याचा विचार करतो किंवा आठवड्यांतून कांहीं दिवस कारखाना बंद ठेवण्याचा ठराव करतो. परंतु ही गोष्ट मजुरांना मानवत नाहीं व ते आपल्या बाजूनें संपाचा कट करतात. केव्हां केव्हां कोणत्या कोणत्या सुट्या असाव्या, किती तास दररोज काम घ्यावें. वगैरे वरून तंटा उपस्थित होतो. सारांश, कारखानदार व मजूर यांमध्ये मजुरीचे दर, कामाचे तास, काम करण्याच्या वेळा, सुट्टयांचे दिवस व इतर पुष्कळ बाबतींमध्यें मतभेद होण्याचा संभव असतो व अशा त-हनें मतभेद होऊन वादाला गेोष्ट आली म्हणजे संपाचा प्रसंग येतो, म्हणजे संप हा एक कारखानदार व मजूर या विरोधी पक्षांतील औद्योगिक युद्धाचा प्रकार आहे; व ज्याप्रमाणें तडजोडीनें, सामानें किंवा दुस-या शांततेच्या उपायानें तंट्याचें मूळ मिटत नाहींसें झालें म्हणजे निरनिराळी राष्ट्रे आपला तंटा लढाईनें मिटवूं पहातात किंवा पूर्वकाळीं दोन मनुष्यांचा तंटा एकमेकांशीं युद्ध खेळून निकाल लावून घेण्याचा प्रघात असे, तोच प्रकार औद्योगिक व व्यापाराच्या कामांत संपाचा आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं. तेव्हां संपाचा मूळ हेतु कारखानदाराचें काम एकदम बंद पाडून त्याला अडचणींत आणून किंवा लोकांना गैरसोय करून आपल्या