पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/210

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ २ee ] देशाची सुधारणा होत जाईल; व असा वर्ग कायम सा-याच्या पद्धतीनें उत्पन्न होईल; तसेंच कायम सा-याच्या पद्धतीपासून लोकांना सरकाराबद्दल विशेष आपलेपणा वाटतो व असे लोक सुव्यवस्थित राज्यव्यवस्थेचे व राज्याचा स्थैर्याचे कैवारी होतात, हें जाणुन लॉर्ड कार्नवालीसनें कायम सा-याची पद्धति सुरू केली व त्यानंतर पांच वर्षांनीं इंग्लंडमध्येंही कायमसाऱ्याची पद्धति चालू करण्यांत आली. कायम सा-याची पद्धति चांगली किंवा मुदतीच्या साच्याची पद्धति चांगली हा हिंदुस्थानांत एक सध्या वादग्रस्त प्रश्न आहे. सरकार पक्षाचें ह्मण्णें असें आहे कीं, कायम सायाच्या पद्धतीपासून बहुजनसमाजाचा तोटा आहे. कारण जमिनीचा वाढता खंड हा एकाच वर्गाला मिळतो.तेव्हां मुदतीच्या साच्याची पद्धतीच

चांगली आहे. हें सरकारच्या उत्पन्नाच्या दृष्टीनें ठीक आहे. परंतु है. लोकपक्षाचें ह्मणणें असें आहे कीं, कायम सा-याच्या पद्धतीनें लोकांना जमिनीबद्दल आपलेपणा वाटतो व त्यामुळे जमिनीची मशागत उत्तम होऊन देशाच्या शेतीची भरभराट होऊन लोक सुखी होतात. या प्रश्नाचे  उत्तर छोट्या शेतीच्या भागांतच खरोखरी आलेलें आहे. कारण -- त्या शेतीचा विशेष ह्मणजे स्वामित्वाची जाणीव हा होय. जमीन आपली आहे ही पूर्ण भावना असली म्हणजे मनुष्य लागवड काळजीनें करतो.पण आपण शेतीची सुधारणा केली असतां त्याचा फायदा दुस-यालाच मिळणार अशी स्थिति असली कीं, मनुष्याचें मन आपली जमीन सुधारण्याकडे लागणार नाही. कांहीं अंशीं हा प्रकार युरोपांतील अंधैलतिर्धल पद्धतीमध्येंही दिसून येतो. तेव्हां छोट्या शेतीचा विशेष तिच्या मिराशीपणांत आहे, छोटेपणांत केवळ नाहीं हे ध्यानांत ठेविलें ह्मणजे कायमसाऱ्याची पद्धति व मुद्तीच्या साऱ्याची पद्धति यांपैकीं चांगली पद्धति कोणती याचा तेव्हांच निर्णय होतो. कायम सा-याची पद्धति हिदुस्थानाला लागू करावी असा येथल्या अधिका-यांचा मनोदयही होता. एल्फिन्टन, मनरो, कार्नवालिस, बेटिंग्स, कॅर्निग वगैरे पहिल्या पिढीचे हिंदुस्थानांतील युरोपियन मुत्सद्दी यांची या कायम सा-याच्या पद्धतीला अनुकूलता होती व त्याअन्वयें नवीन मिळालेल्या अलाहाबाद व  अयोध्या या संयुक्त प्रांतांना कायम साऱ्याची पद्धति लागू करण्याचा जाहिरनामासुद्धा १८०३ साली निघाला होता. तसेंच मद्रासेसही रयत