पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/203

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[१९३ ] भावना वगैरे गुण फार हितावह आहेंत व या पद्धतींत हे गुण उद्भवण्यास व त्यांची वाढ होण्यास फार वाव असतो व यामुळेंच मिराशी शेतक-याचा सामाजिक दर्जा भाडोत्री सांगकाम्या मजुराच्या वरचा होतो. अशा मिराशी शेतक-यांमध्यें देश आपला अशी भावना दृढतर होते व देशाचा कारभार उत्तम त-हेनें चालला पाहिजे तरच त्यांत आपलें कल्याण आहे असा हितकर समज उत्पन्न होतो. वरील कारणाकारितां मिराशी छोट्याशेतीची पद्धति ही एकंदर देशांतील लोकांना जास्त हितकर आहे असें ह्मणणें प्राप्त आहे. इंग्लंडमध्यें प्रचंड शेतीची पद्धत चालू असल्यामुळें बहुतेक अर्थशास्रकारांचा कल त्या पद्धतीकडे झुकता आहे. परंतु प्रथमतः युरोपांतील मिराशी पद्धतीची चांगली माहिती मिळवून ती पद्धति प्रचंड शेतीपक्षां कशी जास्त श्रेयस्कर आहे हें मिल्लनें आपल्या प्रसिद्ध ग्रंथांत दाखविलें. तेव्हांपासून पुष्कळ लोकांचे व लेखकांचें लक्ष या पद्धतीच्या चांगुलपणाकडे वेधलें. इंग्लंडामध्यें ही पद्धति सुरू करणें इष्ट आहे अशी चळवळ सुरू झाली. परंतु इंग्लंडांतील जामिनीचे कायदे व देवंघेवीचे कायदे शेताचे लहान लहान तुकडे पाडण्याला मोठ्या अडथळ्याप्रमाणें असल्यामुळे ह्मणण्यासारखा या पद्धतीचा प्रसार होऊं शकला नाहीं. १८९० सालीं छोट्याशेतीचा प्रसार करण्यास कोठें कोठें सवड आहे वगैरे प्रश्नांचा विचार करण्याकरितां एक कमिशन नेमलें गेलें व त्या कमिशनच्या शिफारशीप्रमाणें १८९२ मध्यें कौंटीकौन्सिलला मोठीं शेतें विकत घेऊन त्यांचे लहान लहान शेतांचे तुकडे करुन ते लोकांना देण्याचा अधिकार दिला.परंतु सक्तीच्या कायद्यानें शेतें संपादन करण्याचा अधिकार या कौन्सिलास न दिल्यामुळें व कौन्सिलांतील सभासद या पद्धतीला फारसे अनुकूल नसल्यामुळें हा १८९२ चा कायदा निवळ द्प्तरीं पडल्यापैकींच झाला. या काळांत छोट्या पद्धतीचा जो थोडाबहुत फैलाव इंग्लंडमध्यें झालेला आहे, तो खासगी प्रयत्नाचा परिणाम होय. परोपकारी लोकांनीं खासगी संस्था स्थापन करून त्यांचेमार्फत मोठमोठीं शेतें खरेदी करून तीं शेतें गरीब शेतक-यांमध्यें वांटून देण्याचें काम केलें व अशा प्रयत्नाचा कांहीं कांहीं परगण्यांत फार चांगला परिणाम दिसून येऊं लागला आहे. या पद्धतीनें मोठमोठ्या जमीनदारांचा खंड वाढून शिवाय शेतकरी-मजुरांची १३